Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरलगतच्या अकरा गावांत रोज १८५ टन कचरा निर्मिती, पन्नास टन कचरा उघडयावर ! घनकचरा व्यवस्थापनसंबंधी महापालिकेत चर्चा !!शिक्षणाधिकारी-वेतन पथकाच्या आदेशाला मुख्याध्यापकांचा थंडा प्रतिसाद, माहिती सादर करण्यास विलंबमुश्रीफांची ईच्छा चेअरमनपदाच्या राजीनाम्याची ! पदाधिकारी-कार्यकर्ते म्हणतात राजीनामा होऊ देणार नाही !!संगणकाअभावी सदरबाजारमधील डिजिटल लायब्ररी बंद, आपने वेधले लक्षजिपच्या कृषी विकास अधिकारीपदी राजेंद्र मानेवालावलकर ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम, अस्थिरोग रुग्णांची माफक फीमध्ये तपासणीन्यू कॉलेज वनस्पतीशास्त्र विभागाच्या पुढाकाराने कार्यशाळा, वनस्पतींच्या प्रजाती संरक्षणासंबंधी चर्चासत्यजीत कदमांचा आरोप, हडबडलेली महापालिका ! तिघा अधिकाऱ्यांना नोटीस !बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विकास कांबळे, उपाध्यक्षपदी सुजाता देसाई सर्किट बेंचसंबंधी लवकरच नोटिफिकेशन,  आयटीपार्कच्या जागेचा निर्णय पंधरा दिवसात-अमल महाडिक

जाहिरात

 

सत्यजीत कदमांचा आरोप, हडबडलेली महापालिका ! तिघा अधिकाऱ्यांना नोटीस !

schedule23 Jul 25 person by visibility 139 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथे ड्रेनेज पाइपलाइनचे काम न करता तब्बल ८५ लाख रुपये बिल ठेकेदाराने उचलल्याचा आरोप माजी नगरसेवक व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम यांनी केला. कदम यांच्या आरोपाने महापालिका प्रशासन यंत्रणा हडबडली आहे. महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी  या प्रकरणी तत्कालिन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, तत्कालिन उपशहर अभियंता रमेश कांबळे आणि कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना नोटीस काढली आहे. शिवाय या विषयांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

माजी नगरसेवक कदम यांनी हा विषय समोर आणला. कसबा बावडा येथील जाधव घर ते बडबडे मळा दरम्यान दोन कोटी ४२ लाखांचे ड्रेनेज पाइपलाइन कामासाठी ठेकेदार प्रसाद वराळे यांची ऑगस्ट २०२१ मध्ये नियुक्ती झाली होती. आतापर्यत या कामासाठी चार बिले दिली आहेत.  साठ टक्के काम शिल्लक असताना ठेकेदाराने पाचचे खोटे बिल तयार करुन शेवटचे ८५ लाख रुपयाचे बिल उचलले. खोटा एमबीए (मोजमाप पुस्तिका), अधिकाऱ्यांच्या खोटया सह्या करुन ठेकेदाराने बिल तयार करुन रक्कम उचलली. कदम यांनी हा सारा प्रकार समोर आणत चौकशीची मागणी केली आहे.

 माजी नगरसेवक कदम यांनी, ‘या फसवणुकीमागील ‘आका’ कोण याचा शोध घेतला पाहिजे. ‘आका’चा शोध घेतल्याशिवाय ठेकेदार इतका मोठा घोटाळा करू शकणार नाही. शिवाय ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांना निलंबित करावे.’अशी मागणी केली आहे. ठेकेदार  वराळे यांनी खोटया सह्या करुन बिल उचलल्याची कबुली दिली आहे. दरम्यान बिल मंजुरीच्या प्रक्रियेत खोटया सह्यांची, मोजमापाची शहानिशा कशी काय झाली नाही ? महापालिकेची फसवणूक होत असतानाही एकाही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब कशी आली ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी तिघा अधिकाऱ्यांना नोटीस काढली आहे. या प्रकाराची चौकशी करुन ते अहवाल प्रशासकांना सादर करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes