खाजगी शाळांच्या प्रलंबित मागण्याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू : शिक्षणराज्यमंत्री पंकज भोयर
schedule07 Aug 25 person by visibility 63 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :खाजगी शाळांमधील संच मान्यता ,शिक्षक भरती , अर्जित रजा रोखीकरण व अन्य प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक घेऊन खाजगी शाळांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले . महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीतर्फे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी शाळांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिक्षण राज्यमंत्री भोयर यांना दिले. समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समितीचे राज्यसचिव शिवाजी भोसले व पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनांत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार खाजगी शाळातील पायाभूत वाढीव पदे मंजूर करावीत , मुख्याध्यापकांचे अर्जित रजेचे रोखीकरण पूर्ववत सुरू करावे , पंधरा मार्च २०२४ चा संयमान्यतेचा आदेश रद्द करावा, सहवी व सातवी मधील वीसपर्यंतच्या पटाला एक शिक्षक पद मंजूर करावा ,चालू वर्षाच्या संच मान्यता तीस सप्टेंबरच्या पटावर द्याव्यात, नपा व मनपा क्षेत्रातील खाजगी शाळांची मेडिकल बिलांची शंभर टक्के रक्कम राज्य शासनामार्फत द्यावी, इयत्ता चौथी व सातवी साठीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा सरकारी आदेश लवकर काढण्यात यावा व शिक्षकांना मेडिक्लेम योजना लागू करावी या मागण्यांचा समावेश आहे. मंत्री भोईल यांनी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक लावून राज्यातील खाजगी प्राथमिक शाळेच्या प्रलंबित प्रश्नमार्गी लावले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. समितीच्या विभागीय अध्यक्ष महादेव डावरे , जिल्हाध्यक्ष कुमार पाटील, शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे ,ग्रामीण विभाग प्रमुख मुरलीधर पाटील , संस्थाप्रमुख शिवाजी बुवा उपस्थित होते .