सरकार उद्योग विकासासाठी सकारात्मक, उद्योगांच्या प्रश्नासंबंधी उद्योगमंत्रीसोबत लवकरच बैठक-सत्यजीत कदम
schedule07 Aug 25 person by visibility 144 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उद्योजकांच्या विविध प्रश्नासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांचेसोबत बैठक घेवू असे प्रतिपादन शिवसेनेचे समन्वयक सत्यजीत कदम यांनी केले. त कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशने आयोजित केलेल्या औद्योगिक विकास आणि समस्या याबाबत सर्व औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलत होते.
‘सध्याचे सरकार उद्योग विकासासाठी सकरात्मक आहेत. कोल्हापूरच्या सर्वांगिण तसेच उद्योगविकासासाठी निश्चितपणे कामे केले जातील. विकासाची कामे हाती घेतल्यावर कांही लोक त्याला विरोध करतात त्यामुळे बरेच कॉन्ट्क्टर कोल्हापूरची कामे करण्यास तयार होत नाहीत. कोल्हापूरात गुंतवणूक सुरक्षित राहील का याची भिती त्यांना वाटते. रोजगारासाठी मुले बाहेर गावी जात आहेत, यामुळे भविष्यात कोल्हापूर हे ज्येष्ठ नागरिकांचे राहण्याचे शहर म्हणून ओळखले जाईल. कआज ब-याच ठिकाणी चार वर्षापुर्वीच गॅस पाईप लाईन आल्या आहेत. परंतु कांही लोकांनी विरोध केल्याने ब-याच ठिकाणी हे काम बंद आहे.
शिवाजी उद्यमनगरचा एफएसआय वाढवून दुप्पट करणे, अंडरग्राउंड वायरिंग करणे, रस्ते ,गटारी दुरूस्ती, कचरा उठाव करणे, धोकादायक झाडांच्या फांदया तोडणे, शिवाजी उद्यमनगर येथील अतिक्रमण डेपोची झालेली दुरावस्था, औद्योगिक वसाहतीतील पाण्याची वेळ सकाळी आठ नंतर करण्यासंबंधी चर्चा झाली. यावेळी शिरोली , गोकूळशिरगाव, कागल येथील विविध समस्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी प्रास्तावित केले. उपाध्यक्ष श्रीकात दुधाणे यांनी स्वागत केले. सचिव कुशल सामाणी यांनी आभार मानले. केले. टेस्ला कंपनीत निवड झाल्याबद्दल ऋषीराज दिनेश बुधले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रसन्न तेरदाळरक, स्मॅक-शिरोलीचे शेखर कुसाळे, गोशिमा-गोकुळ शिरगावचे सुनिल शेळके, मॅक-कागलचे संजय पेंडसे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, संजय अंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासोा कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे,जयदीप मांगोरे, प्रकाश चरणे, प्रदीपभाई कापडिया, देवेंद्र ओबेरॉय, हिंदूराव कामते, अशोकराव जाधव, जयकुमार पवार, सुभाष चव्हाण, नंदकुमार नलवडे, विश्वजीत सावंत, निवास मिठारी, सागर जाधव, दिलावर शेख, पांडूरंग पाटील, चोरगे अभिजीत नवाळे, आशिष जाधव, फारूक हुदली, शंतनु गायकवाड, जितेंद्र बामणे, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, उपस्थित होते.