Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारण्यांच्यापेक्षा लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाजासमोर झळकली पाहिजेत-प्रकाश आबिटकरमॅनेजमेंटसाठी पाच अर्ज वैध, भाटियांचा अर्ज अवैध ! हंगेरगीकरांच्या उमेदवारीला सुटाचा आक्षेप !कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट ! सरकारने गरिबांच्या शिक्षणाचे दायित्व निभवावे- पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटीलप्रा. दत्ता जाधव यांना पीएचडीराष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची दमदार कामगिरीव्यवसाय परवाना दरवाढीला व्यावसायिकांचा विरोध ! महापालिका अन् चेंबर ऑफ कॉमर्स आमनेसामने !!बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, सर्वाधिक बक्षीसाची स्पर्धा शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागेसाठी सहा अर्जदूध विक्रीत गोकुळचा नवा रेकॉर्ड ! कर्मचाऱ्यांनी केला चेअरमनांचा सत्कार

जाहिरात

 

योध्दा वकील …शेतकरी चळवळीसाठी रुपयाचेही मानधन न घेता काम !

schedule18 Mar 25 person by visibility 117 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी अॅड. योगेश पांडे यांच्या वकिली पेशाविषयी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या न्यायालयीन लढयासाठी दिलेले योगदान यासंबंधी लिहिलेला लेख. त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे

‘राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना एक रक्कमी एफ. आर. पी देण्याचा निर्णय पूर्ववत करण्याबाबतचा ऐतिहासिक निर्णय काल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने देवून ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा दिला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात दुरूस्ती करण्याचे अधिकार नसताना  २०२२ मध्ये तुकड्या तुकड्याने एफ. आर. पी देण्याचा शासन निर्णय केला. याबाबत मी माझे चळवळीतील सहकारी मित्र उच्च न्यायालयातील वकील योगेश पांडे यांच्यासोबत चर्चा केली. या निर्णया विरोधात आम्ही उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले. 
       ॲड. योगेश पांडे यांची एक गुंठाही जमीन नाही, एक कांडही ऊस कारखान्यास जात नाही. पण गेल्या अनेक वर्षापासून त्यांना शेतकरी चळवळीबद्दल आस्था असल्याने ते निस्सीमपणे चळवळीत कार्य करत असतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रवक्ते पदाच्या माध्यमातून शेतक-यांच्या व्यथा देशपातळीवर मांडण्याचा ते प्रयत्न करतात. २०२२ मध्ये याचिका दाखल केल्यापासून ते निकाल लागेपर्यंत ॲड. योगेश पांडे यांनी  एक रूपयाही मानधन न घेता काम केले. अगदी रिट पिटीशन करिता लागणा-या कागदपत्रांचा खर्चही त्यांनी स्वत: केला. साखर आयुक्त कार्यालय, मंत्रालय अथवा इतर कार्यालयातून लागणारी सर्व कागदपत्रे त्यांनी स्वखर्चाने काढली. एकीकडे राज्य सरकार , साखर संघ यांच्यावतीने लाखो रूपयांचा चुराडा करत राज्याचे महाभियोक्ता यांच्यासह अनेक दिग्गज वकीलांची फौज शेतक-यांच्या विरोधातील  निर्णय कायम ठेवण्यासाठी उभी करण्यात आली होती. 
   मात्र ॲड. योगेश पांडे यांनी अत्यंत अभ्यासूपणे व वास्तव भूमिका उच्च न्यायालयापुढे मांडत गेल्याने एक रक्कमी एफ. आर. पी मिळण्याच्या निर्णयाचा मार्ग सुकर झाला. उच्च न्यायालयामध्ये एखाद्या गोष्टीवर न्याय मागायचे म्हणजे सामान्य माणसासाठी व चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी मोठे आव्हान असते. वकीलांची लाखो रूपयाची फी, प्रत्येक तारखेस द्यावे लागणारे मानधन, कागदपत्रांच्या नावाखाली होणारा वारेमाप खर्च यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीस येतो. याप्रकरणी सरकारच्या विरोधात लढायच म्हणजे लष्कराच्या भाक-या भाजण्यातला प्रकार होता.  पण गेल्या तीन वर्षात ॲड. योगेश पांडे यांनी एक पान झेरॅाक्सचाही खर्च आम्हा चळवळीतील लोकांना करू दिला नाही. ज्यावेळेस उच्च न्यायालयात सुनावणी असायची तेंव्हा अनेकवेळा ते स्वखर्चाने पुणे ते मुंबई व मुंबई ते पुणे फे-या मारल्या. 
     कालच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतक-यांना जो दिलासा मिळाला आहे त्याचे सर्व श्रेय हे ॲड. योगेश पांडे यांचे आहे. शहरी  भागात राहून शेतकरी चळवळीवर प्रेम करत त्यांनी जे योगदान दिले आहे ते न विसरण्यासारखे आहे. अन्यथा या व्यवस्थेविरोघात रस्त्यावरची लढाई लढता लढता न्यायालयीन लढाईत चळवळीतील लोक मेटाकुटीस येतात. “सत्य परेशान होता है ,लेकीन कतई पराजित नही होता “ असे महात्मा गांधी म्हणत. योगेश पांडे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे खिंड लढवित या लढाईत विजय मिळविला याबद्दल तमाम ऊस उत्पादक शेतक-यांच्यावतीने त्यांचे मनापासून आभार.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes