विवेकानंद कॉलेज म्हणजे सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महाद्वार - प्राचार्य अभयकुमार साळुंखे
schedule26 May 26 person by visibility 32 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देऊन शैक्षणिक वाटचालीमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचे ज्ञान केंद्र म्हणजे विवेकानंद कॉलेज आहे. समाजातील निरनिराळ्या स्तरातून आणि परिस्थितीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिपूर्ण पोषक स्पर्धेचे वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणे हेच अंतिम ध्येय या ज्ञान केंद्राचे आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विवेकानंद कॉलेज हे महाद्वार आहे.’ असे मत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी काढले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. विज्ञान शाखेतील अनुक्रमे पहिले तीन प्रथमेश परमेश्वर काकडे याने 94.67 टक्के, श्रद्धा गणपती सुतार 92.17 टक्के, संचिता नरेंद्र कुलकर्णी यांनी 92 टक्के, वाणिज्य इंग्रजी माध्यम शाखेतील आर्या वरद दीक्षित व अनिश आनंदा संकपाळ यांनी 95.6७ टक्के, मनुष्री प्रसन्ना शहा 95.33 टक्के, स्वालीहा चौधरी 93.33 टक्के, गुण मिळवून प्रथम तीन क्रमांक पटकावले. वाणिज्य मराठी माध्यम शाखेतून साना देसाई 88.67 टक्के , साक्षी बाबासो तोरस्कर व रणवीर राजाराम अनपट यांनी 86 टक्के, स्नेहल माने 84.67 टक्के, गुण मिळवत प्रथम तीन क्रमांक पटकाविले.
कला शाखेमधून आभा भूषण कपाले ८७.६७ टक्के, यशोधन नंदकिशोर अनुसे 87.33 टक्के, ,संस्कृती राजेंद्र रानगे 84. 83 टक्के गुण मिळवून प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले तसेच जिऑलॉजी विषयात 9 विद्यार्थ्यांनी , गणित विषयात 04 व अकौटन्सी विषयात 03 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले. अशा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाने बारावी परीक्षेत गेले तीन दशके अव्वलस्थानी राहून आपली यशोगाथा कायम राखली आहे, असे विचार अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी बी पाटील यांनी मांडले. प्रा. शिल्पा भोसले यांनी प्रास्ताविक केले. विज्ञान शाखाप्रमुख प्रा. मुकुंद नवले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्राध्यापिका एस. पी. वेदांते, प्राध्यापिका ए पी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.