शिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश
schedule25 May 26 person by visibility 276 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर के कामत यांनी सोमवारी 25 मे 2026 रोजी सर्व विद्याशाखांच्या प्रभारी अधिष्ठाता यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये डॉ. राजाराम गुरव (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा), डॉ. महादेव देशमुख (मानव्यविज्ञान विद्याशाखा), डॉ. वर्षा मैंदर्गी (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) आणि डॉ. अजय साळी (आंतरविद्याशाखा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कामत यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सोमवारी प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती केली. तसेच चार विद्याशाखांच्या प्रभारी अधिष्ठातांच्याही नियुक्त्या झाल्या.