आरोग्य विभागातील तेवीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
schedule26 May 26 person by visibility 95 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने झाली. पाच आरोग्य पर्यवेक्षक महिला, अकरा आरोग्य सहायक महिला, सात पुरुष आराग्य सहायक आरोग्य अशा २३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली.