Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलनकरवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगाकोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन: आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार - शशिकांत शिंदेमहे येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वरुटे यांचा सत्कार उद्योगमंत्र्यांची पत्नी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत !  निलम शिर्के, वर्षा उसगावकर, सुशांत शेलार, सतीश रणदिवे, आनंद काळेंचे अर्ज, मातब्बर कलाकार निवडणुकीपासून लांबच ! !

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती

schedule25 May 26 person by visibility 214 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी डॉ. ज्योती प्रफुल्ल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्या शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्रकुलगुरू  ठरल्या.  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर के कामत यांनी  त्या संदर्भातील आदेश सोमवारी 25 मे 2026 रोजी काढले. ज्योती जाधव यांची सलग  दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी  नियुक्ती झाली. शिवाजी विद्यापीठात त्या दोन दशकाहून अधिक काळ कार्यरत आहेत. जागतिक स्तरावरच्या शास्त्रज्ञ आहेत. बायो केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या प्रोफेसर आहेत. यापूर्वी त्यांनी जवळपास नऊ महिने शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी प्रकुलगुरू म्हणून काम पाहिले आहे. नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आर के कामत यांची नियुक्ती झाली. कुलगुरू कामत यांनी सोमवारी, डॉ ज्योती जाधव यांची प्रकुलगुरुपदी नियुक्तीचा आदेश काढला. 

शिक्षण, संशोधन आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांवर भर: डॉ. ज्योती जाधव

शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती केल्याबद्दल डॉ. ज्योती जाधव यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना लर्नर टू अर्नर बनविणारे शिक्षण देणे, विद्यापीठातील संशोधनाला जागतिक ओळख प्राप्त करून देणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अभिनव उपक्रम राबविणे या त्रिसूत्रीवर काम करीत विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्याचा मानस डॉ. जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes