विनोद डिग्रजकर यांना आकाशवाणीकडून अत्युच्च श्रेणी
schedule22 Feb 25 person by visibility 112 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विनोद डिग्रजकर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी आकाशवाणी व दूरदर्शनची अत्युच्च श्रेणी ( टॉप ग्रेड) जाहीर झाली आहे. भारत सरकारच्या प्रसार भारती संचालनालयाकडून त्यांना यासंबंधीचे पत्र प्राप्त झाले आहे. संगीत विभागाचे कार्यकारी अधिकारी आशुतोष कुमार यांनी हे पत्र दिले आहे. डिग्रजकर हे स्थापत्य अभियंता आहेत. शास्त्रीय गायक आहेत. कलाकार म्हणून ज्येष्ठता आणि संगीत क्षेत्रातील योगदान लक्षात घेत त्यांना ही श्रेणी प्रदान केली आहे.