यूपीएससीतील १८ उत्तीर्ण उमेदवारांच्या यशात विद्या प्रबोधिनाच्या शिष्यृवृत्तीचे पाठबळ
schedule22 Apr 25 person by visibility 127 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम निकालातून येथील विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या शिष्यवृत्ती बॅचमधील तब्बल अठरा विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यामध्ये कागल तालुक्यातील यमगे येथील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव सिद्धाप्पा डोनेने ऑल इंडिया रॅंक ५५१ तर अनंतनगर, फुलेवाडी येथील हेमराज हिंदूराव पणोरेकर याने ९२२ क्रमांकाने उत्तीर्ण आहेत. हेमराजचे वडील हे निवृत्त लिपिक आहेत तर आई गृहिणी आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहयोगातून महाराष्ट्रीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती निवासी तथा अनिवासी स्वरूपात दिली जाते. यामध्ये परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या टप्प्यांवर परीक्षार्थींना त्यांच्या गरजेनुरूप अध्ययन सहाय्य देखील केले जाते. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १८ विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी सहाय केले होते. राज्यातील इतर भागातून उत्तीर्ण झालेल्या यशवंतांची नावे पुढील प्रमाणे पुष्पराज नानासाहेब खोत 304, मोहिनी विजय सूर्यवंशी 464, संकेत अरविंद शिंगटे 479, बिरदेव सिद्धाप्पा डोने 551, वीर ऋषिकेश नागनाथ 556, रोहन राजेंद्र पिंगळे 581, दिलीपकुमार कृष्णा देसाई 605, नम्रता अनिल ठाकरे 671, ओंकार राजेंद्र खुंटाळे 673, नितीन अंबादास बोडके 677, अभय दिगंबर देशमुख 704, अभिजीत सहदेव अहेर 734, श्रीतेश भूपेंद्र पटेल 746, शिवांग अनिल तिवारी 752, योगेश ललित पाटील 811, सृष्टी सुरेश कुळे 831, संपदा धर्मराज वांगे 839 रँक आहे.
दरम्यान मंत्री पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. देशाच्या जडण घडणीत महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवांमधील महाराष्ट्रीय उमेदवारांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तर कमी खर्चाच्या बरोबरीने अलीकडे खाजगी संस्थांमधून मिळणरे दर्जेदार मार्गदर्शन आणि इतर सोयी सुविधा उपलब्धत होत असल्याने पुणे पाठोपाठ कोल्हापूरमध्ये यूपीएससीच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे लगतच्या काळात कोल्हापूर देखील या परीक्षांच्या तयारीसाठीचे महत्वाचे केंद्र ठरेल असे मत यावेळी विद्या प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.