ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
schedule20 Mar 25 person by visibility 61 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्याचा २०२४ चा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च रोजी पूरस्कार समितीची बैठक झाली होती.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुरस्कारासाठी शिल्पकार सुतार यांची २०२४ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पंचवीस लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.सुतार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावचे आहेत. ते
जगद्विख्यात शिल्पकार आहेत. सुतार जगद्विख्यात शिल्पकार आहेत. शंभराव्या वर्षीही ते शिल्पकलेत सक्रिय आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रपुरूषांचे तसेच अनेक महान विभुतींचे पुतळे साकारले आहेत. जगभरातील अनेक शिल्पकृतींच्या उभारणीत सुतार यांचे योगदान आहे.
शंभराव्या वर्षीही ते शिल्पकलेत सक्रिय आहेत. जगभरातील अनेक शिल्पकृतींच्या उभारणीत सुतार यांचे योगदान आहे. मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प हे शिल्पकार सुतार हेच साकारत असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले.