वीरशैव बँकेची निवडणूक बिनविरोध, नवीन चेहऱ्यांना संधी
schedule18 Dec 25 person by visibility 34 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :दक्षिण महाराष्ट्रातील नामांकित बँक अशी ओळख असलेल्या दि वीरशैव् को ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. १९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे बिनविरोध निवडीची औपचारिकता शिल्लक आहे. बँकेत सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना निवडणूक लढविता येणार नाही या सहकार कायद्यामुळे ज्येष्ठ संचालकांना यंदा बाजूला व्हावे यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली.
सर्वधारण गटामध्ये अभिजीत सोलापुरे, चेतन देसाई, प्रकाश दत्तवाडे, राजेंद्र माळी, राजशेखर येरटे, रवींद्र बनछोडे, रोहन लकडे, संदीप नष्टे, सतीश घाळी, शशिकला निल्ले, श्रीशैल्य चौगुले, श्वेता हत्तरकी, सिद्धांत पाटील-बुदिधहाळकर, सुषमा तवटे, वैभव सावर्डेकर, वरुन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. महिला गटातून इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, विद्या पाटील तर अनुसूचित जाती व जमाती गटातून गुरुदेव स्वामी यांची अर्ज असल्याने बिनविरोध निवडी झाल्या. बुधवारी १७ डिसेंबर रोजी अर्ज माघारीचा दिवस होता. सर्वसाधारण गटातून २६ जणांनी माघार घेतली. महिला गटातून चौघींनी माघार घेतली. १९ जागासाठी १९ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक बिनविरोध झाली. अधिकृत घोषणा निवडणूक कार्यक्रमानुसार होणार आहे. यामुळे जानेवारी महिन्यात अधिकृत घोषणा होईल.