Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अधिकाऱ्यांना शिवीगाळ- महापालिकेत शडडू, सभागृहाला न शोभणारी मर्दुमकी ! नगरसेवकांच्या कृत्यामुळे, नेत्यावर माफीची वेळ ! !नगरसेवकांना समज देणार, ऐकले नाहीत तर खासबागेत कुस्ती लावू - हसन मुश्रीफसीईओचे जिल्हाधिकारीपदाकडे लक्ष, कार्तिकेयन झेडपीत किती दिवस काम करणार कोण जाणे ? लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढीवालावलकर हायस्कूलमध्ये गुढी ज्ञानाचीगुढी पाडव्यानिमित्त भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळफुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !

जाहिरात

 

गोकुळचा जातीवंत म्हैशींच्या संगोपनावर भर; राधानगरीत कृती कार्यक्रमाला प्रतिसाद

schedule18 Dec 25 person by visibility 276 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : दूध व्यवसाय टिकवून नफ्यात नेण्यासाठी आधुनिक व शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. स्थानिक जनावरांच्या तुलनेत जातीवंत म्हैशी अधिक दूध देतात. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते.’असे मत गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी व्यक्त केले.

 

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील (चुयेकर) म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कृती कार्यक्रम २०२५२६’ अंतर्गत राधानगरी येथे प्राथमिक दूध संस्था सचिवांची विभागीय मिटिंग राधानगरी येथे उत्साहात पार पडली. दूध उत्पादनात लक्षणीय वाढ करण्यासाठी पारंपरिक पद्धतींना फाटा देत जातीवंत म्हैशींची खरेदी व सुधारित संगोपन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय या मिटिंगमध्ये घेण्यात आला.

 गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके यांनी उपस्थित दूध संस्था सचिवांना जनावरे खरेदी करताना आवश्यक पारखखरेदीनंतरचे हवामान व आहार व्यवस्थापन तसेच कमी खर्चात अधिक दूध उत्पादन कसे मिळवता येईलयाबाबत माहिती दिली. दरम्यानके.डी.सी.सी. बँकेचे निरीक्षक रामभाऊ इंगळे यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती देत म्हैस खरेदीसाठी बँकांकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याची प्रक्रिया स्पष्ट केली.

लहान संस्थांच्या सचिवांनी किमान दोन तर मोठ्या संस्थांच्या सचिवांनी किमान चार ते पाच जातीवंत जनावरे खरेदी करण्याचा निर्धार करण्यात आला. बोरवडे शीतकरण केंद्राचे दूध संकलन अधिकारी राजेंद्र चौगलेसहाय्यक दूध संकलन अधिकारी पी.डी.चव्हाणमुकुंद पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes