करवीर तहसिलदारपदी स्वप्नील पवार
schedule18 Dec 25 person by visibility 114 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हाधिकार कार्यालयातील अपर चिटणीस स्वप्नील पवार यांची करवीर तहसिलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव मनिषा जायभाये यांनी हा बदलीचा आदेश काढला आहे. बुधवारी, सतरा डिसेंबर रोजी नियुक्तीचा आदेश निघाला आहे. करवीर तहसिलदार पद गेले काही दिवस रिक्त होते. या रिक्तपदावर पवार यांची नियुक्ती झाली आहे.