Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

schedule30 May 25 person by visibility 60 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३० मे ते एक जून २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम होत आहे. अशी माहिती मल्हारसेना सरसेनापती बबनराव रानगे यांनी दिली. अहिल्यादेवी यांची जयंती शनिवारी, ३१ मे रोजी साजरी होत आहे. आपटेनगर, नवीन वाशी नाका येथील स्मारक परिसरात कार्यक्रमांचे सादरीकरण आहे.

शुक्रवारी, ३० मे रोजी  वाशी येथील शिवाजी लांडगे यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आहे. सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. ३१ मे रोजी सकाळी ९.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन कार्यक्रम आहे. खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी दहा वाजता सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी शाहीर बाबूराव कांबळे हे पोवाडा सादर करतील. रात्री सात वाजता फुलेवाडी रिंगरोड येथील महालक्ष्मी माऊली सेवा मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आहे.

रविवारी, एक जून रोजी सायंकाळी पाच वाजता मिरजकर तिकटी येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा, चित्ररथ, धनगरी ढोल, गजनृत्य, बेंजो पथक, लेझीम पथकाचा समावेश आहे. शोभायात्रेत नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes