Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकरनेर्लीत सतेज - ऋतु बैलगाडी शर्यतीचा थरार, सरपंच राजा-आरएक्स बैज्या बैलजोडीने जिंकले मैदान वीरशैव लिंगायत दीपस्तंभ पुरस्कारांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा मरणोत्तर सन्मानराजारामपुरीतून रॅली, कार्यकर्त्यांच्या घोषणा अन् जल्लोषी स्वागत ! विजय जाधव यांचा कार्यालय प्रवेश !!चंदेरी आठवणींना उजाळा देत प्रभात फिल्म कंपनीचा वर्धापनदिन साजराबाजार समितीच्या ५५ माजी संचालकांना नोटीस, जिल्हा सहकार उपनिबंधकांची कार्यवाहीगोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोलेवीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापुरात दोन दिवसीय समर यूथ समिट

जाहिरात

 

गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिक

schedule31 May 25 person by visibility 790 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका यासह गोकुळ दूध संघाची निवडणूक सुद्धा महायुती म्हणूनच आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढवणार आहोत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील आमच्यासोबत असतील. ते महायुतीचे घटक आहेत. महायुतीत मंत्री आहेत." असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
खासदार महाडिक यांची शनिवारी (३१ मे) सायंकाळी कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाल्यामुळे आपणाला आनंद आहे असे स्पष्ट केले. तसेच गोकुळच्या अध्यक्षपद निवडीवरून ज्या काही घडामोडी घडल्या त्या कुठल्याही प्रक्रियेत माझा सहभाग नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार महाडिक पुढे म्हणाले, गोकुळचा राज्य राष्ट्रीय पातळीवर लौकिक आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, पी एन पाटील, आनंदराव पाटील चुयेकर, अरुण नरके यांनी दूध उत्पादक शेतकरीहिताचा कारभार करत गोकुळचा नावलौकिक उंचावला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाची साथ मिळाली. असे हे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना उद्देशून बोलताना खासदार महाडिक म्हणाले, " ते खूप थोर आहेत. गोकुळच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून  दबावतंत्र टाकत निवडणूक जिंकली.    खरं तर सहकारात पक्षीय राजकारणाची सुरुवात त्यांनीच केली. त्यांनी सत्तेच्या माध्यमातून त्यावेळी जे केले आता त्याची दुसरी बाजू घडली. त्यांचा गोकुळ दूध संघातील गेल्या काही वर्षातील कारभार दूध उत्पादक सभासदांना चांगलाच माहीत झाला. माझे आव्हान आहे,  त्यांनी दूध उत्पादकांसमोर जाहीरपणे सांगावे की, महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील यांची सत्ता असताना गोकुळच्या एकूण ठेवी किती होत्या आणि आता किती ठेवी आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी वासाच्या दुधाचा मुद्दा लावून धरला होता. त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी वासाचे दूध किती प्रमाणात लोकांना परत केले  ? पूर्वी गोकुळच्या 3600 दूध संस्था होत्या. गेल्या चार वर्षांमध्ये त्यामध्ये दोन हजारांहून अधिक संस्था वाढल्या. वाढलेल्या संस्थेच्या  तुलनेत दुधाचे प्रमाण किती वाढले... निवडणूक आणि मतावर डोळा ठेवून त्यांनी संस्था वाढवल्या मात्र त्यांच्या या कारभाराचा फटका प्रामाणिक दूध उत्पादकांना बसत आहे. मी विचारलेल्या या साऱ्या प्रश्नासंदर्भात त्याने श्वेतपत्रिका काढावी म्हणजे त्यांचा कारभार दूध उत्पादक शेतकऱ्यांना कळेल. गोकुळच्या अध्यक्ष पदाच्या निवडीच्या कालावधीत त्यांनी शशिकांत पाटील चुयेकर यांचा बळी दिला.
महाडिक म्हणाले,  ग्राहकांच्यावर कसलाही आर्थिक बोजा न टाकता दूध उत्पादकांना ज्यादा दूध दर देण्याची त्यांनी ग्वाही दिली होती आता ते अकरा रुपये दूध दरवाढ केली म्हणतात मात्र हे दूध दरवाढ ग्राहकांच्या माथी मारुन केले आहे. असा टोलाही त्यांनी मारला. गोकुळचे नूतन अध्यक्ष नविद मुश्रीफ हे  महायुतीचे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासह गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणूनच आम्ही सगळे एकत्रितपणे लढू. मंत्री हसन मुश्रीफ हे देखील आमच्या सोबत असतील. याचा महाडिक यांनी पुनरुच्चार केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes