न्यू कॉलेजमध्ये मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
schedule19 Jul 25 person by visibility 58 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित शिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या न्यू कॉलेजमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी सध्या ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी भाग एक-दोन-तीन, बीए (एमजेसी) भाग भाग एक-दोन-तीन, एम ए लोकप्रशासन भाग एक व दोन, एम कॉम भाग एक व दोन, बीलिब या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू आहे. प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी एस. एस. इंगवले (9545660400) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.