प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
schedule18 Jan 22 person by visibility 1004 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा ७७ वा वाढदिवस विवेकानंद शिक्षण संस्थेत अत्यंत साध्या व कोविडचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी शुभागी गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ आर. व्ही. शेजवळ, सहसचिव (अर्थ) प्राचार्य एस.एम.गवळी, संस्थेचे सी. ई. ओ. कौस्तुभ गावडे यांनी अभिष्टचिंतन केले.
याप्रसंगी विवेकानंद सप्ताह व प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'ज्ञान शिदोरी' या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गुरुदेव कार्यकर्त्यांकडून १००० ग्रंथ ग्रंथालयाला भेट देण्यात आले. या वाढदिवसाचे औचित्य साधून 'विवेकानंद कॉलेजच्या नव्या वेबसाईट'चे उदघाटन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिर पार पडले. अभय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्योगपती व्ही. बी. पाटील व पद्मजा तिवले यांच्या सहकार्याने अनाथ आश्रमातील मुलांना वह्या, पुस्तके व फळे वाटप करण्यात आली. यावेळी बी. व्होक. विभागाचे प्रा.सतीश उपळावीकर यांनी ॲक्रेलीक माध्यमात तयार केलेले रेखाचित्र प्रकाशित करण्यात आले.
यावेळी आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ.श्रुती जोशी, परीक्षा विभाग प्रमुख प्रा जी एस नवाथे, रजिस्ट्रार श्री. सी. बी. दोडमणी, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी यांच्यातर्फे प्राचार्य साळुंखे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.