तात्यासाहेब कोरे डिप्लोमा अभियांत्रिकीत पायथॉन प्रोग्रामिंग कार्यशाळा उत्साहात
schedule26 Aug 25 person by visibility 26 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातर्फे तीन दिवसीय " पायथॉन प्रोग्रामिंग " कार्यशाळा झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख तज्ञ म्हणून एक्सेल कम्प्युटर्सचे अरुणा चव्हाण यांनी प्रशिक्षण दिले. कार्यशाळेसाठी वारणा विभाग शिक्षण मंडळांचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी यांनी प्रोत्साहन दिले. प्राचार्य प्रा . पी. आर. पाटील व सल्लागार डॉ .पी.एम. पाटील यांचे सहकार्य लाभले.
कार्यशाळेमध्ये पायथॉन या आधुनिक व लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषेवरील प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये कोर पायथॉन, डेटा स्ट्रक्चर्स, अॅरे, ऊप्स कॉन्सेप्ट यावर प्रोग्रामिंग केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आयडीएलई , व्हीएस कोड, ज्युपिटर या सॉफ्टवेअरचा सराव करून प्रत्येक्ष अनुभव घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आणि रोजगारक्षमतेला चालना देणारी ठरली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी तसेच विषय शिक्षकांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. ए. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. प्रा. पी. व्ही. चव्हाण, प्रा. एस. व्ही.सुर्वे, प्रा. डी. आर. माने (ऑफिस इन्चार्ज ) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.