पारंपारिक वाद्याच्या गजरात संभाजीनगरच्या गणपतीचे आगमन
schedule26 Aug 25 person by visibility 78 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पारंपारिक वाद्यांचा गजर, रोषणाईने उजळलेला परिसर, उत्साहाचा वर्षाव आणि गणपतीचे गुणगान करणारा जयघोष अशा चैतन्यदायी वातावरणात मंगळवारी (२६ ऑगस्ट २०२५), कोल्हापुरातील नवसाला पावणारा मानाचा गणपती असलेल्या श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या श्री गणरायाचे आगमन झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. आझाद चौक येथून मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी अजित सासणे, नेताजी शिंदे, किशोर यादव, अमर बागल, मनोज पाटील, स्वप्नील गवळी, संजय सासणे, चेतन जाधव, विनायक लुगडे उपस्थित होते.