कोल्हापुरात वंध्यत्व विषयक दोनदिवसीय कार्यशाळा
schedule11 Jul 25 person by visibility 35 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वंध्यत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून, यावर योग्य निदान व उपचाराची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर (इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन– महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अॅण्ड गायनेकॉलॉजी सोसायटी यांच्या सहभागाने १२ व १३ जुलै २०२५ रोजी वंध्यत्व विषयक दोन दिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती डॉ.पद्मारेखा जिरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी डॉ.शिशिर जिरगे उपस्थित होते.
या परिषदेचे उद्घाटन १२ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के शिवाजी यांच्या हस्ते होणार आहे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर किरण कुर्तकोटी असतील. ही परिषद कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. परिषदेमध्ये स्त्री व पुरुष वंध्यत्व, हार्मोनल असंतुलन, आधुनिक उपचारपद्धती, जनुकीय चाचण्या, आणि नवीनतम तंत्रज्ञान यांसारख्या वंध्यत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे.राज्यभरातील आणि देशपातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि या क्षेत्रातील अग्रणी संशोधक मार्गदर्शन करणार आहेत. नवोदित डॉक्टर व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ही परिषद एक मौल्यवान शैक्षणिक संधी ठरणार आहे.
महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. पद्मारेखा जिरगे व कोओजिएसच्या अध्यक्षा डॉ. मनीषी नागवकर यांनी सांगितले की, “या परिषदेमुळे कोल्हापूरमधील स्त्रीरोगतज्ज्ञांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. अमित पतकी, डॉ. केदार गणला, डॉ. तानाजी पाटील, डॉ. रणजित किल्लेदार, डॉ. साधना पटवर्धन, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. सतीश पतकी, डॉ. मिलिंद पिशवीकर, आणि डॉ. प्रविण हेन्द्रे हे सर्व या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.