Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ठठ डद नगरपालिकेसाठी चुरशीने मतदान, नेतेमंडळीत शाब्दिक चकमक ! कार्यकर्ते हमरीतुमरीवर ! !टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणातील ज्युनिअर कॉलेजमधील दोन प्राध्यापक निलंबितटीईटी सक्तीच्या विरोधात पाच डिसेंबरला जिल्ह्यातील शाळा शंभर टक्के बंद, कलेक्टर ऑफिसवर मोर्चानेहरु हायस्कूलला विदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेटनगरपालिका-नगरपंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरलाकोल्हापूर चित्रपट व्यवसायाचा १०५ वर्धापनदिन साजरा मार्केट सेस रद्दसाठी व्यापारी एकवटले, शुक्रवारी जिल्ह्यातील व्यापार बंदगोकुळची उत्पादने सौंदत्ती यात्रेसाठी रवानाशिवाजी विद्यापीठाचा ऋषी देसाई ठरला खेलो इंडियातील वेगवान धावपटू

जाहिरात

 

नगरपालिकेसाठी चुरशीने मतदान, नेतेमंडळीत शाब्दिक चकमक ! कार्यकर्ते हमरीतुमरीवर ! !

schedule03 Dec 25 person by visibility 62 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीसाठी अतिशय चुरशीने मतदान झाले. पक्ष आणि स्थानिक आघाडयांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली होती. मतदानादिवशी या निवडणुकीतील ईर्षा प्रत्येक मतदारसंघात दिसली. जिल्ह्यात ७८.८७ टक्के मतदान झाले. मुरगूड,मलकापूर वडगाव, पन्हाळा, कागल, हुपरी, कुरुंदवाड येथे जास्त चुरस पाहावयास मिळाली. मतदानासाठी महिला मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी किरकोळ वादावादी झाली कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्याने काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. बोगस मतदानाच्या तक्रारी झाल्या. गडहिंग्लज येथे मंत्री हसन मुश्रीफ व जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरे या एका मतदान केंद्रावर आमनेसामने आल्या. या दोघांतील शाब्दिक चकमक काही वेळ तणाव निर्माण करणारी ठरली.

जयसिंगपूर (७०.२० टक्के), मुरगूड (८८.४३ टक्के),  मलकापूर (८६.९९ टक्के), वडगाव (८६.२४ टक्के ), गडहिंग्लज  (७३.५६ टक्के ), कागल  (८०.८०) टकके, पन्हाळा (८४.६६ टक्के ), कुरुंदवाड (८२.९५ टक्के ), हुपरी (८०.८५ टक्के), आण्ि शिरोळ (७८.२३ टक्के) नगरपालिकेसाठी इतके मतदान झाले. जिल्ह्यातील आजरा (७७.८६ टक्के), चंदगड (८४.०८ टक्के) तर हातकणंगले (८३.९९ टक्के) नगरपंचायतीसाठी मतदान झाले आहे. जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मिळून एक लाख १६८ पुरुष मतदार तर एक लाख एक हजार ५१२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर रांगा होत्या.

दरम्यान मतदान प्रक्रियेदरमम्यान ठिकठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंग घडले पेठवडगाव येथे स्थानिक आघाडीतील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना या ठिकाणी बळाचा वापर करावा लागला. शिरोळ येथील मतदान केंद्रावरुन नमस्कार करण्यावरुन दोन गटातील कार्यक्रर्ते एकमेकांच्या अंगावर धावले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले. मुरगूड येथील प्रभाग क्रमांक नऊ येथील मतदान केंद्रावर दुपारी मतदान यंत्राचे बटण दाबत नसल्याची तक्रार झाली. मात्र अधिकाऱ्यांनी त्याचे खंडन करत प्रक्रिया सुरळीत असल्याचे स्पष्ट केले. हुपरी येथील लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल केंद्रातील मतदान यंत्रावर एका उमेदवाराच्या नावापुढे अंगठयाचा ठसा उमटवल्याचा प्रकार समोर आल्यावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया खोळंबली. शिवाय होळकर नगर येथील मतदान केंद्र आवारात प्रवेश करण्यावरुन हमरीतुमरीचे प्रकार घडले. दरम्यान प्रशासनाने मतदान प्रक्रिया दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली होती. तसेच मतदारांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध केले होत्या. काही मतदान केंद्रावर सेल्फी पॉईंट उभारले होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes