कोल्हापूर चित्रपट व्यवसायाचा १०५ वर्धापनदिन साजरा
schedule02 Dec 25 person by visibility 24 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १०५ वा ‘‘कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन समारंभ’’ कॅमेरा मानस्तंभ, खरी कॉर्नर येथे साजरा करण्यात आला. रविंद्र वसंतराव पंदारे,नृत्य दिग्दर्शक दिपक बिडकर यांच्या हस्ते कलामहर्षि बाबुराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र फिल्म कंपनी या महाराष्ट्रातील एक अग्रगण्य चित्रपट निर्मिती संस्था या संस्थेची स्थापना १९१९ रोजी कॅमेरा मानस्तंभ घरी कॉर्नर या ठिकाणी झाली.महाराष्ट्र फिल्म कंपनीचे जनक कलामहर्षी बाबुराव पेंटर आणि आनंद पेंटर या दोन बंधूंनी या कंपनीची स्थापना केली. महाभारतातील कीचकवधच्या कथानकावर काढलेला सैरंध्री हा चित्रपट संस्थेचा पहिला चित्रपट निर्माण करुन तो पुण्यामध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक चित्रपट या कंपनीने निर्माण केले. संस्थेची सुरुवात एक डिसेंबर १९१९ रोजी झाली तो दिवस कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन म्हणून अखिल भारतीय महामंडळतर्फे दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानुसार यंदाही आयोजित कार्यक्रमाला चित्रपट महामंडळाचे संचालक रणजीत जाधव, सतीश बीडकर, मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर,सदानंद सुर्यवंशी, चित्रपट निर्माते विजय शिंदे, अनिल काशीकर,अशोक माने, बाबा पार्टे, महेश पन्हाळकर, सुभाष गुंदेशा दिलीप काटे, बाळकृष्ण बारामती, शाम काणे, हणमंत जोशी, सुनील मुसळे, , किसन कल्याणकर,हेमसुवर्णा मिरजकर, माधवी जाधव, बबिता काकडे, कल्पना बडकस, वनिता दीक्षित, महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापक रविंद्र बोरगावकर आदी उपस्थित होते.