नाळ प्रभागांशी...कामे विकासाची ! लोकसेवेत गवंडी कुटुंबीय !!
schedule05 Jan 26 person by visibility 33 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंचग्ंग तालीम परिसरातील गवंडी कुटुबींय म्हणजे भागातील अनेकांचे आधारवड. प्रभागातील कोणतीही समस्या असो, नागरिकांची महापालिकेशी निगडीत कामे असो लोक हक्काने त्यांच्याकडे धाव घेतात. इतका विश्वास निर्माण झाला आहे. आनंदराव गवंडी यांच्यापासून सुरू असलेला हा सामाजिक, राजकीय कार्याचा वारसा पुत्र प्रकाश गवंडी, स्नुषा माधवी गवंडी नेटाने चालवित आहेत. जानेवारी २०२६ मध्ये होत असलेल्या महापालिका निवडणुकीत माधवी प्रकाश गवंडी या प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून त्या लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या त्या उमेदवार आहेत.
आनंदराव गवंडी यांना सारा परिसर आबा या नावांनी ओळखयचा. त्यांनी तीन वेळेला या प्रभागातून निवडणूक जिंकली. १९८५, १९९५ व २००० या तीन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. त्यांनी स्थायी समिती सभापती म्हणून काम करताना प्रभागात अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या समाजकार्य व राजकारणाचा वारसा त्यांचे पुत्र प्रकाश गवंडी यांनी चालविला. लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवित २०१० मध्ये महापालिका निवडणूक विजयी केले. नगरसेवक म्हणून पाच वर्षे त्यांनी भागात अनेक कामे केली. या कामाच्या बळावर २०१५ मधील महापालिका निवडणुकीत प्रकाश गवंडी यांच्या पत्नी माधवी गवंडी या विजयी ठरल्या. २०१५ मध्ये हा प्रभाग महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवित त्यांनी महापालिकेत प्रवेश केला.
२०१० ते २०१५ या कालावधीत नगरसेवक म्हणून काम करताना प्रकाश गवंडी यांना कोणतेही पद मिळाले नाही. पक्षाने त्याची भरपाई २०१९ मध्ये केली. ९ जुलै २०१९ मध्ये माधवी गवंडी या महापौर झाल्या. महापौरपदाच्या माध्यमातून त्यांनी विविध कामांचा पाठपुरावा केला. पायाभूत सुविधांची पूर्तता करताना त्यांनी सामाजिक कार्यातही आघाडीवर राहिल्या. २०१९ मधील महापुराच्या कालावधीत प्रकाश गवंडी व माधवी गवंडी यांनी पूरग्रस्तांना विविध सुविधा पुरविल्या. पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतराला प्राधान्य दिले. महापूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छता मोहिम राबविली. पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम राबविली. धनवडे गल्ली, दत्त मंदिर गल्ली, बाळेश्वर महादेव मंदिर, शंकराचार्य मठ परिसरात चॅनेलचे काम केले. आता त्या महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचारफेरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.