Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
करवीर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा ! सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील, उपसभापतिपदी भाजपच्या दिपाली पाटील वालावलकर हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र बनसोडे यांना  जाहीरगोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा गडहिंग्लजमध्ये सत्कारअनुसूचित जाती आरक्षण बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वेदा माळीला शंभरपैकी शंभर गुण, देशात अव्वल नगरसेविका, महिला अधिकारी क्रिकेटच्या मैदानावर! शिक्षिकेनही लुटला खेळाचा आनंद ! !महापालिकेतील रिक्त जागांच्या भरतीप्रश्नी काँग्रेस आक्रमक, गुरुवारपासून साखळी उपोषणशहर स्वच्छतेसाठी कोल्हापूर फर्स्टचे पाऊल, महापालिकेला दिल्या चार स्विपिंग मशिन्सस्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकरकॉमर्स कॉलेजच्या तीस विद्यार्थ्यांची निवड

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची इसरोकडे झेप विमान प्रवासासह अभ्यास सहलीचे आयोजन

schedule06 Jan 26 person by visibility 148 categoryशैक्षणिक

 

कोल्हापूरदि. ५ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समिती अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या शाळांमधील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीअंतर्गत विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अनुभव देण्यात येणार असूनहे विद्यार्थी मंगळवार दि. ६ जानेवारी २०२६ रोजी इसरो अभ्यास सहलीसाठी विमानाने रवाना होणार आहेत. या अभ्यास सहलीमध्ये १३ मुले व १२ मुली असे एकूण २५ विद्यार्थीदोन मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिकाएक अधिकारी व एक महिला डॉक्टर असा एकूण २९ जणांचा समावेश आहे.

       महानगरपालिकेच्या प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाते. या उपक्रमासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्यात येते. असा उपक्रम सातत्याने राबविणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका असलेचे उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.

       सदर सहलीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असूनविमान प्रवासइसरो येथील निवास व्यवस्था तसेच परतीच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी महानगरपालिका मुख्य इमारत चौकातून केएमटी बसद्वारे विद्यार्थ्यांना विमानतळावर रवाना करण्यात येणार असूनयानिमित्त महापालिकेच्या चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes