कोल्हापूरच्या समाजकारण - राजकारणातील आश्वासक चेहरा
schedule06 Jan 26 person by visibility 225 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ऋतुराज क्षीरसागर, कोल्हापूरच्या समाजकारण व राजकारणातील आश्वासक चेहरा. शांत, संयमी वृत्ती आणि साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तीन दशकाहून अधिक काळ शिवसेनेत सक्रिय असलेल्या क्षीरसागर कुटुंबांतील हे तरुण नेतृत्व विविध माध्यमातून लोकसंपर्कात आहे. महापालिका निवडणूक लढवायची म्हणून कार्यकर्ता या नात्याने ते प्रभागात सातत्याने काम करत आहेत. लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील असतात.
जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्वसाधारण गटातील उमेदवार आहेत. प्रभागात त्यांचा संपर्क आहे. लोकांची महापालिकेशी निगडीत कामे असोत की अन्य सरकारी कार्यालयांशी निगडीत समस्या, त्यांच्या सोडवणुकीसाठी ते जातीनिशी लक्ष घालतात. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे ते चिरंजीव. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर हे गेल्या तीन दशकाहून अधिक काळ शिवसेनेत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार समाजकारण व राजकारण करत आहेत. क्षीरसागर यांच्या पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर कायम विश्वास ठेवला. शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर आहे.
ऋतुराज क्षीरसागर हे वडिलांचा समाजकारण व राजकारणाचा वारसा नेटाने पुढे चालवित आहेत. मात्र आमदार क्षीरसागर यांचे पुत्र इतक्यापुरतेच त्यांची ओळख सिमित नाही. ऋतुराज हे गेली पंधरा वर्षे युवा सेनेच्या माध्यमातून काम करत आहेत. नो मर्सी ग्रुपद्वारे ते युवकांचे नेतृव् करतात. त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून काम करत असताना विविध विषय हाताळले.
विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, डोनेशन विरोधी मोर्च,रोजगाराचे प्रश्न यासह शाळा महाविद्यालयावर आरोग्य शिबिर, मैत्री युवा महोत्वाचे आयोजन केले. एक कार्यकर्ता या नात्याने लोकसंपर्कात राहून काम करण्यावर त्यांचा फोकस आहे.क्षीरसागर कुटुबीयांचा सामाजिक, राजकीय कार्याचा वारसा पुढे चालविताना त्यांना लोकांची नाळ तुटू दिली नाही. पक्षाने त्यांच्यातील नेतृत्वगुण, काम करण्याची क्षमता पाहून महत्वाच्या पदावर नियुक्ती केली. युवासेनेच्या हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे ते अध्यक्ष आहेत. महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधून निवडणूक लढवित असताना महायुतीची ध्येयधोरणे, शहर विकासाच्या संकल्पना लोकांसमोर मांडत आहेत. नागरिकांच्या त्यांच्या प्रचारफेरीना चांगला प्रतिसाद मिळत आहे.