पिंड कार्यकर्त्याचा, वृत्ती साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची
schedule06 Jan 26 person by visibility 169 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कुणाल शिंदे म्हटलं की धडपडणारा कार्यकर्ता असे चित्र डोळयासमोर उभे राहते. कोणताही राजकीय वारसा नसताना हा तरुण समाजकारण व राजकारणात सक्रिय आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरामध्ये सर्वसाधारण ड गटातून लढत आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाद्वारे मैदानात उतरला आहे.
कुणाल शिंदे हा मूळचा शिवसेनेचा कार्यकर्ता. गेली अनेक वर्षे पक्षात कार्यरत आहे. महापालिका निवडणूक लढवायची म्हणून विविध माध्यमातून तयारी केली होती. प्रभागातील बागेचे सुशोभिकरण, महापालिकेकडे पाठपुरावा करुन प्रभागात साफसफाईची काम करवून घेतली. वारकऱ्यांसाठी सुविधा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, भागातील रस्ते व ड्रेनेज कामासाठी पाठपुरावा केला. शहरात ज्यावेळी अुपरा पाणी पुरवठा झाला त्यावेळी प्रयत्न करुन महापालिकेच्या टँकरची उपलब्धता केली. प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत होईल याकडे लक्ष दिले. प्रभागात आरोग्य कॅम्प भरविले.
महापालिका निवडणूक लढवायची म्हणून प्रभागात संपर्क ठेवला. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग ठरलेला. पक्षाकडे, महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ११ मध्ये उमेदवारी मागितली. मुलाखत दिली. महायुतीच्या जागा वाटपात पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. निवडणूक लढवायची तयार केलेली, प्रभागातील लोकांशी संपर्क साधला.लोकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवायचे ठरविले. जनसुराज्य शक्ती पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक ११ मधील सर्वसाधारण गटातील ते उमेदवार आहेत. यंदा चार सदस्यीय प्रभाग रचना आहे. प्रभागाचा विस्तार मोठा आहे. वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आाहे. लोकांपर्यंत पोहोचून निवडणूक लढविण्यामागील भूमिका मांडत आहेत. पदावर नसताना लोकांसाठी काम करत आहे, एक वेळ संधी द्या, तक्रार करायला जागा शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही देत आहेत. कोणताही राजकीय वारसा नाही, मात्र कार्यकर्त्याचा पिंड असलेला हा उमेदवार, प्रभागातील अनेकजण त्याच्या पाठीशी उभे ठाकत आहेत. प्रचार संपर्कादरम्यान लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.