त्या दोन नेत्यांनी भूतकाळातील राजकारण उगाळण्यापेक्षा वर्तमानातील विकास स्थितीवर बोलावे - राजू माने
schedule05 Jan 26 person by visibility 55 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे. संघटन कौशल्य आहे. आर्थिक सत्ता आहेत. त्यांनी एकमेकांचे भूतकाळातील राजकारण उगाळण्यापेक्षा कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासकामांच्या स्थितीवर बोलावे. या दोन नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे शहराच्या विकासाला फटका बसत आहे असे स्पष्ट मत एसफोरए विकास आघाडीचे राजू माने यांनी मांडले. कोल्हापूर शहराच्या विकासाचा व्यापक अजेंडा घेऊन आपण काम करत आहोत या निवडणुकीत आमच्या आघाडीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार होते. परंतु लोकांचे प्रबोधन करण्यावर आमचा भर आहे त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माने म्हणाले, "गेली वीस वर्षे कोल्हापूर शहराच्या विकासाच्या बाबतीत सत्तेत व विरोधात असणारे हे दोन्ही नेते आज एकमेकांचे विरोधात महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही नेत्यांनी शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊन काम करावे. शहर म्हणजे उद्योग, रोजगार निर्मितीचे केंद्र असते. मग या दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर शहरातील कोणते उद्योग, रोजगार निर्मितीसाठी कोणते प्रयत्न केले? यावर चर्चा झाली पाहिजे. पुढील दोन ते तीन वर्षे हददवाढ होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. कोल्हापूर मेट्रोसिटी झालीच पाहिजे यासाठी कोल्हापूर महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापन होण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत असे माने यांनी सांगितले. चांगुलपणाची चळवळ या अभियानाचे प्रमुख पारस ओसवाल म्हणाले, " महानगरपालिका ही शहराच्या विकासाचा अजेंडा ठरवत असते. महापालिका सभागृहात चांगले लोक निवडून गेले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. भ्रष्टाचार विरहीत कामकाज झाले पाहिजे. त्यासाठी आपण लोकांचे प्रबोधन करत आहोत. " पत्रकार परिषदेला आघाडीचे खजानिस विकास यादव, श्रीकांत बामणे, शशिकांत पाटील, रुपेश घडशी, दत्तात्रय माने आदी उपस्थित होते