चोरट्यांकडून तेरा लाख किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत
schedule23 Jul 24 person by visibility 474 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने इचलकरंजी परिसरातील तीन घरफोड्यांचा गुन्ह्याचा यशस्वी तपास करून दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून २१९ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख पंधरा हजार रुपये, मोपेड असा तेरा लाखहून अधिक मुद्देमाल हस्तगत केला. इचलकरंजी नदीवेस नाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. रियाज इमाम कचनूर (वय 45 रा विक्रम नगर इचलकरंजी ), बजरंग रामचंद्र चौधरी ( रा. चांदणी चौक इचलकरंजी) अशी दोघां संशयितांची नावे आहेत. त्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील चोरी केलेले दागिने सोनार शुभम पाटील याला विकले असल्याचे चोरट्याने सांगितले. पोलीस सोनाराचा शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे हवालदार सतीश जंगम, संजय कुंभार, प्रशांत कांबळे, अमित सर्जे, महेश खोत, सागर माने ,सचिन बेंडखेळे ,राजू कांबळे ,सुशील पाटील यांनी तपास केला.