Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर फर्स्टचा सोमवारी वर्धापनदिन, महापालिकेस करणार स्विपींग मशिन प्रदानगोकुळमध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रम वूमेन इन लीडरशिप कार्यक्रमात उलगडली स्त्रीशक्तीची कर्तबगारी सांगलीत मंत्र्यांनी केले विद्यार्थिनींचे औक्षण, चंद्रकांत पाटलांच्याकडून स्त्रीशक्तीचा सन्मानस्वप्नांना बळ अन् संस्कारी शिक्षण ग्रामीण भागामध्ये देणारा शहीद  पॅटर्न कौतुकास्पद :  राज देशमुखशिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरणगोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभ

जाहिरात

 

कोल्हापूर फर्स्टचा सोमवारी वर्धापनदिन, महापालिकेस करणार स्विपींग मशिन प्रदान

schedule08 Mar 26 person by visibility 31 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शाश्वत आणि सर्वांगिण विकास’ हे सूत्र ठरवून कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘कोल्हापूर फर्स्ट’चा प्रथम वर्धापनदिन सोमवारी (९ मार्च २०२६) आयोजित केला आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून कोल्हापूर फर्स्टतर्फे महापालिकेस चार स्विपींग मशिन प्रदान करण्यात येणार आहेत. रेसिडेन्सी क्लब येथील रेजेंटा हॉल येथे सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम होत आहे.

महापौर रुपाराणी निकम, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, व्हाइस चेअरमन अॅड. सर्जेराव खोत, डॉ. अमोल कोडोलीकर, प्रताप पाटील, सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव उज्ज्वल नागेशकर, जयदीप पाटील, खजानिस सीएस पद्मसिंह पाटील, सहखजानिस सीए नितीन हरुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कोल्हापूर फर्स्टमध्ये वीसहून अधिक संस्था आणि संघटनांचा सहभाग आहे. यामध्ये कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, क्रीडा प्रतिष्ठान, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आयआयएफ कोल्हापूर चॅप्टर, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स, कोल्हापूर चार्टर्ड अकौटंटस असोसिएशन, आयसीएसआय कोल्हापूर चॅप्टर, दि इन्स्टिटयुशन ऑफ इंजिनीअर्स कोल्हापूर, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ कोल्हापूर, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखा कोल्हापूर, जेपी इंडस्ट्रीयल पार्क असोसिएशन, एसएलआयएमए हातकणंगले, सोसायटी ऑफ एनेस्थिसियोलॉजी कोल्हापूर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रक्टिशनर्स असोसिएशन, कोल्हापूर ऑप्थेल्मोलॉजी असोसिएशन या संस्था - संघटनांचा सहभाग आहे.कोल्हापूर शहर आणि जिल्हयाच्या विकासाशी निगडीत विविध प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला जातो. प्रशासन, लोकप्रितिनधी, लोकसहभाग आणि प्रसारमाध्यम या साऱ्यांच्या संयुक्त सहकार्यातून कोल्हापूरचा शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने संस्थेचे काम सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes