Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदम

जाहिरात

 

वूमेन इन लीडरशिप कार्यक्रमात उलगडली स्त्रीशक्तीची कर्तबगारी

schedule08 Mar 26 person by visibility 181 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डी वाय  पाटील कॉलेज  ऑफ  इंजिनीरिंग  अँड  टेकनॉलॉजीमध्ये महिला विकास कक्षातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त “वूमन इन लीडरशिप : ड्रायविंग इंनोव्हेशन अँड मीनिंगफ़ुल इम्पॅक्ट ” या विषयावर विशेष कार्यक्रम उत्साहात  झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नेतृत्व, नवोपक्रम आणि समाजातील महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीची प्रचिती घडली.

 इंडियन  नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट एंड कल्चरल हेरिटेजच्या कन्व्हेनर आर्किटेक्ट अमरजा  राजाराम निंबाळकर, तेज कुरिअर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर  साधना सुरेश घाटगे, मेनन पिस्टन्सच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शरण्या सचिन मेनन, भरतनाट्यम नृत्यांगना  कविता नायर आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व समुपदेशक डॉ. उर्मिला सुरेश भोसले यांनी आपल्या अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

 कार्यक्रमाला डी वाय पाटील ग्रुपच्या  सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, सर्टिफाइड योगा टीचर, योगा  इंस्ट्रुक्टर पूनम गुप्ता, इंटर्नल कॅम्पलायंन्स कमिटीच्या (आय.सी.सी.) माजी प्रमुख डॉ. क्षमा कुलहल्ली व सामाजिक कार्यकर्त्या डॉ . रचना संपतकुमार  याची विशेष उपस्थिती होती.   

 आर्किटेक्ट अमरजा  निंबाळकर यांनी वारसा वास्तू संवर्धन आणि बांधकाम क्षेत्रात महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करत तरुणींनी वास्तुशास्त्र व संवर्धन क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले. साधना घाटगे यांनी उद्योगक्षेत्रातील अनुभव सांगत नेतृत्व, शिस्त आणि निर्णयक्षमता यांचे महत्त्व स्पष्ट केले. शरण्या मेनन यांनी आधुनिक उद्योगव्यवस्थेत नवोन्मेषी विचार आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. कविता  नायर यांनी कला आणि संस्कृती क्षेत्रातून व्यक्तिमत्त्व विकास व आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्व सांगितले तर डॉ. उर्मिला सुरेश भोसले यांनी मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी याबाबत मार्गदर्शन केले. श्रीलेखा साटम यांनी योग्य मनुष्यबळ निवडताना घ्यावी लागणारी काळजी, जबाबदारीचे वाटप, कामाचे व्यवस्थापन, आत्मविश्वास विविध कौशल्यांची गरज यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी  आयसीसी प्रेसिडिंग ऑफिसर एन. डी. जिरगे आणि  फॅकल्टी कोऑर्डिनेटर इंजि. गौरी म्हेतर यांनी विशेष मेहनत घेतली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन  लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes