Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशाजिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूकजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदनगोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावर

जाहिरात

 

विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना

schedule07 Mar 26 person by visibility 1035 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन केल्याची तक्रार झालेल्या केआयटी कॉलेजमधील प्रा. सौरभ जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कॉलेज प्रशासनाने त्यांच्या विरोधात ज्या तक्रारी झाल्या आहेत त्या संबंधीची  चौकशी करण्यासाठी समिती  स्थापन केली आहे. केआयटी कॉलेजचे संचालक मोहन वनरोटी यांनी यासंदर्भातील ही माहिती दिली. प्रा. जोशी यांच्या विरोधात विद्यार्थिनीने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये संबंधित प्राध्यापकाने अश्लील वर्तन केल्याचे म्हटले आहे. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर केआयटी व्यवस्थापनने या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे . संबंधित प्राध्यापकाला तत्काळ नोकरीतून निलंबित केले तसेच त्यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीची अनुषंगाने चौकशी करण्यासाठी एका समितीची ही स्थापना केली. केआयटी कॉलेजमध्ये गैरकृत्य  खपवून घेतले जाणार नाही. के आय टी ही नामांकित शैक्षणिक संस्था आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे कॉलेज म्हणून लौकिक आहे असे संचालक  वनरोटी यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes