Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ढढ णणआता विश्रांती नाही, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार - सतेज पाटील थकीत भत्त्यासाठी शिक्षकांचा शुक्रवारी महापालिकेसमोर शंखध्वनी आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया कोरेंच्या  उपस्थितीत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीर- एक आत्मातात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडजिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण ? भाजप - राष्ट्रवादीत भाऊबंदकी, अध्यक्षपदावरुन घासाघीस ! !तारा भवाळकर, भास्कर पेरे,अशोक रोकडेंना पुरस्कार ! बुधवारी वितरण समारंभ ! !राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कारअकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !

जाहिरात

 

आता विश्रांती नाही, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार - सतेज पाटील

schedule16 Feb 26 person by visibility 347 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " येत्या मार्च महिन्यात  गोकुळच्या रणांगणाला सुरुवात होईल. आपल्याला संघर्ष नवीन नाही. आता विश्रांती नाही. गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची आपली तयारी आहे. येत्या महिन्याभरात भरपूर घडामोडी होणार आहेत. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण हे अजून ठरत नाही.  राष्ट्रवादी मोठा भाऊ ठरणार  की नाही माहित नाही. त्यांना मोठा भाऊ मानले नाही तर आम्ही तयार आहे.राजकारणात बरेच चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पलीकडच्या बाजूवर लक्ष ठेवावं लागते. गरज पडली तर  जिल्हा परिषदेत खेळ करायची आमची तयारी आहे . महायुतीमध्ये राष्ट्रवादीला मोठा भावाचा मान मिळाला नाही तर आम्ही तो मान द्यायला तयार आहोत " असे सूचक विधान काँग्रेसचे विधान परिषदेमधील गट नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्षांच्या विजयी सदस्यांचा सत्कार काँग्रेस कमिटी येथे आयोजित करण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी काँग्रेस कमिटी येथे झालेल्या या सत्कार सोहळ्याला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. खासदार शाहू महाराज हे अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी , आमदार जयंत आसगावकर,  माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज पाटील,  राजू आवळे,  राजू किसन आवळे , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील, बिद्री कारखानाच्या संचालक राहुल देसाई, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे  गोकुळचे  संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, माजी संचालक पीडी धुंदरे, हिंदुराव चौगले, सदाशिव चरापले आदी उपस्थित होते.
 याप्रसंगी आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची उन्नती  हे आमचे उद्दिष्ट आहे.ग्रामीण भागाचा विकास गोकुळशी निगडित आहे.  येत्या महिनाभरात गोकुळच्या  रणांगणाला सुरुवात होईल.  निवडणुकीला ताकतीने सामोरे जाण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. महाविकास आघाडी म्हणून गोकुळची निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. शिवाय डिसेंबरमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागणार आहे. शेवटी आम्ही या जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय तेथील  संस्थांचे हित जोपासणे महत्त्वाचे असते. या निवडणुकीला सामोरे जाण्याची माझी स्वतःची तयारी आहे. महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. पुढच्या महिन्याभरात बरंच काय घडेल. जिल्हा परिषदेतील राजकारण व सत्तेमध्ये  वर खाली चालले आहे. त्यामुळे राजकारणात पलीकडच्या बाजूला लक्ष  ठेवावं लागतं, विरोधात काय चाललंय हे पहावं लागतं. "

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes