Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
थकीत भत्त्यासाठी शिक्षकांचा शुक्रवारी महापालिकेसमोर शंखध्वनी आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया कोरेंच्या  उपस्थितीत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीर- एक आत्मातात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडजिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण ? भाजप - राष्ट्रवादीत भाऊबंदकी, अध्यक्षपदावरुन घासाघीस ! !तारा भवाळकर, भास्कर पेरे,अशोक रोकडेंना पुरस्कार ! बुधवारी वितरण समारंभ ! !राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कारअकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !प्रख्यात वास्तूशिल्पकार दिलीप भिर्डी  यांचे निधनसंजय गांधी निराधार योजनेच्या शहराध्यक्षपदी दीपक चव्हाण

जाहिरात

 

कोरेंच्या  उपस्थितीत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीर- एक आत्मा

schedule16 Feb 26 person by visibility 106 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. दोघांनीही अध्यक्षपदावर दावा केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीच्या  सदस्यांचे  संख्याबळ 20 असल्यामुळे अध्यक्षपद आम्हालाच आणि पहिला अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असे छातीठोकपणे सांगितले आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिला अध्यक्ष भाजपचा करावा यासाठी आग्रह धरला आहे. कोल्हापुरात महापालिकेत त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये, " जनसुराज्य शक्ती पक्ष व भारतीय जनता पक्ष म्हणजे दोन शरीर आणि एक आत्मा आहे " असे विधान केले.
 " जनसुराज्य व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संख्या 18 पर्यंत पोहोचते. जनसुराज्य सहा सदस्य तर भाजपचे बारा सदस्य निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे 20 सदस्य असल्यामुळे अध्यक्षपद मागत आहेत. मात्र 20 आणि 18 यामध्ये फारसा फरक नाही. यामुळे अध्यक्षपद भाजपला मिळावे यासाठी  प्रयत्नशील आहोत. एकदा अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय झाला की बाकीच्यापदा संदर्भात फार वेळ लागणार नाही. सव्वा वर्षाचा अध्यक्ष करणार असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूर महापालिकेचे नूतन महापौर रुपाराणी निकम व उपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेश सोमवारी 16 फेब्रुवारी 2026 रोजी झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे,  जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम,  नगरसेवक प्रा. जयंत पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून तीन स्वीकृत  सदस्य निवडण्यात येणार आहेत. रविवारी नेते मंडळाच्या चर्चेतून तीन नावे निश्चित केले आहेत. यामध्ये प्रा. जयंत पाटील, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव व सुनील वाडकर यांची नावे निश्चित केल्याचे वृत्त आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes