तारा भवाळकर, भास्कर पेरे,अशोक रोकडेंना पुरस्कार ! बुधवारी वितरण समारंभ ! !
schedule16 Feb 26 person by visibility 35 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संत गाडगे महाराज अध्यासन व करवीर साहित्य परिषद कोल्हापूर यांच्यातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांना ‘प्रा.रा.तु.भगत जीवन गौरव पुरस्कार’ तर आदर्श ग्राम समितीचे सदस्य भास्कर शहादेर पेरे यांना ‘संत गाडगे महाराज समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. येथील व्हाइट आर्मी समूहाचे अशोक रोकडे यांना ‘संत गाडगे महाराज समाज सहाय्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती संत गाडगे महाराज अध्यासनचे अध्यक्ष एस. एन. पाटील, करवीर साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. बी. बीडकर व कोषाध्क्ष एम. डी. देसाई यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, (१८ फेब्रुवारी २०२६) पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. शिवाजी विद्यापीठ येथील एमबीए विभागाच्या सभागृहात दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग प्रमुख एम. बी. शेख उपस्थित राहणार आहेत असे विश्वस्त डॉ. चांगदेव बंडगर, प्रा. जॉर्ज क्रूझ, सिद्धेश भगत यांनी कळविले आहेत. निलिमा सावंत, प्राचार्य डॉ. जी. पी. माळी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.