जाधव कुटुंबीयांची दुसरी पिढी समाजकारण-राजकारणात
schedule05 Jan 26 person by visibility 31 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकांचा विश्वास आणि काम करण्याची वृत्ती या बळावर नगरसेवक ते महापौर असा प्रवास करणारे व्यक्तित्व म्हणजे राजारामपुरीतील माजी महापौर दीपक पांडूरंग जाधव. १९९५ ते २००५ या का महापालिकेत सलग दोन वेळा प्रतिनिधीत्व करताना त्यांनी प्रभागात पायाभूत सुविधांची उपलब्धता तर केलीच शिवाय सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली. आता त्यांच्या स्नुषा सृष्टी करण जाधव या महापालिका निवडणुक लढवित आहेत. प्रभाग क्रमांक पंधरामधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारफेऱ्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन चेहरा आणि सकारात्मक वृत्ती यामुळे मतदारांची पसंती मिळत आहे.
माजी महापौर दीपक जाधव यांचे व्यक्तिमत्व हे सगळया सोबत घेऊन काम करणारे. १९९० पासून ते समाजकारण व राजकारणात आहेत. कार्यकर्ता म्हणून त्यांची राजकारणातील सुरुवात झाली. कार्यकर्ता म्हणून लोकांची विविध कामे करुन दिली यामुळे लोकांचा विश्वास वृद्धिंगत झाला. १९९५ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढविली होती. प्रभागात त्यांनी विविध कामे केली. १९९५ मधील विजयाची पुनरावृत्ती २००० मध्ये झाली. नागरिकांनी दुसऱ्यांना त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी, ‘कोंडाळामुक्त राजारामपुरी’संकल्पना राबविली. ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणासाठी घरोघरी डस्टबीन पुरविले. भागात विविध सुविधा निर्माण केल्या. दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम केल्यानंतर २००५ मध्ये त्यांनी बंधू मुरलीधर जाधव यांना महापालिकेच्या निवडणुकीत उभे केली. विजयाची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली.
नगरसेवकपद हे लोकांसाठी असते या भावनेतून काम करण्याची जाधव कुटुंबीयांची पद्धत आहे. त्याच भावनेने आता जाधव कुटुंबीयातील नवी पिढी राजकारण व समाजकारण करत आहे. दीपक जाधव यांचे चिरंजीव करण जाधव त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवित आहेत. तरुण कार्यकर्ता म्हणून करण जाधव यांनी भागात काम केले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेकांना वैद्यकींय मदत मिळवून दिली. गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तरुण आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ‘कोरोना योद्धा’पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत करण जाधव यांच्या पत्नी सृष्टी या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भाजपाच्या उमेदवार आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रभागात संपर्क आहे.