खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या सराव परीक्षेचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त - मीना शेंडकर
schedule11 Jan 26 person by visibility 57 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल येण्यासाठी सराव परीक्षा अत्यंत उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्था विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.’असे उद्गगार प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी काढले.
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीनेइयत्ता पाचवी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कॉलरशिप सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या सराव परीक्षेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या हस्ते होणार झाले. या सराव परीक्षेचे आयोजन न्यू हायस्कूल पेटाळा येथे केले होते.
पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे म्हणाले , पतसंस्था प्रत्येक वर्षी अशा परीक्षेचे आयोजन करते या परीक्षेबरोबरच सभासदांच्या मुलांना पारितोषिके तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्तरावर चमकणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले जाते. पतसंस्था असे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी बिरादार, शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे उपस्थित होते.पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार यांनी प्रास्ताविक केले. सराव परीक्षेत ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, सराव परीक्षा झाल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये श्रीराम विद्यालयाच्या राजाराम केसरकर यांने प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक बलभीम विद्यालयाच्या महिमा मोरे हिने मिळविला, तृतीय क्रमांक जीवन कल्याण विद्यामंदिरच्या आरव चौगुले यांने मिळवला त्याचबरोबर ऋतुजा कदम ,अर्जुन लाड, शाश्वत संकपाळ, मनवा जाधव, आराध्या सुतार या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन अमित परीट, मानद सचिव वसंत पाटील, संचालक महादेव डावरे, सर्जेराव नाईक, सूर्यकांत बरगे, शिवाजी सोनाळकर , मच्छिंद्र नाळे, राजेंद्र कोरे, राजेश कोंडेकर, रोहिणी यडगे सल्लागार समिती सदस्य आप्पासाहेब वागरे, दशरथ कांबळे, संभाजी सुतार, विद्या पाटील, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी उपस्थित होते. वर्षाराणी वायदंडे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्र संचालक गोरख वातकर यांनी आभार मानले.