सासऱ्यांच्या प्रचारार्थ सूनबाई आघाडीवर, नाईनकवरे कुटुंबीयांचे नातं प्रत्येक घराशी
schedule11 Jan 26 person by visibility 61 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहूपुरीतील नाईकनवरे कुटुंबीय म्हणजे प्रभागातील प्रत्येकाच्या अडचणीला समयी मदतीला धावणारे. प्रसंग कोणताही असो, या कुटुंबातील सदस्य कायम जनतेसोबत. प्रभागातील प्रत्येक घराशी आपुलकीचं नातं तयार झालेलं. प्रभागातील जनतेनही सातत्याने या कुटुंबींयावर प्रेम करत महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिलं. १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका पाहावयास मिळत आहे. प्रभाग क्रमांक चौदामध्ये महायुतीचे उमेदवार प्रकाश नाईकनवरे यांच्या प्रचारार्थ सगळेजण सक्रिय आहेत. यामध्ये आघाडीवर आहेत त्या स्नुषा पूजा स्वप्निल नाईकनवरे. सासऱ्यांच्या प्रचारार्थ सूनबाई प्रभागात घर टू घर प्रचार करत आहेत. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.
प्रकाश नाईकनवरे यांनी तीन वेळेला नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रतिनिधीत्व केलेले. शांत, संयमी नेतृत्व म्हणून ते परिचित. यंदाच्या निवडणुकीत ते महायुती अतंर्गत शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांचा प्रभागातील प्रत्येक घटकांशी स्नेह. यामुळे कार्यकर्ते, मतदारही त्यांच्या प्रचारात दिसतात. उमेदवार प्रकाश नाईकनवरे हे दिवसभर प्रभागातील विविध भागात जनसंपर्कात. कधी रॅली, कधी कॉर्नरसभा, कधी पदयात्रा…! चिरंजीव स्वप्निल नाईकनवरे हे रोजच्या प्रचारात व्यस्त. नियोजनाची जबाबदारीही त्यांच्यावर. तर स्नुषा पूजा स्वप्निल नाईकनवरे या प्रचारात आघाडीवर आहेत. महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभाग पिंजून काढत आहेत.
त्या, २०१५ ते २०२० या कालावधीत नगरसेविका होत्या. शाहूपुरी तालीम प्रभागातून प्रतिनिधीत्व केले. सभागृहात अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची अल्पावधीतच छाप उमटविली. त्यांना प्रभागातील समस्या, लोकांच्या अपेक्षांची जाणीव…त्यासाठी पाठपुरावा आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत प्रभागातील विविध सुविधा निर्माण केल्या. लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागातील नागरिकांशी संपर्क. यामुळे संपूर्ण प्रभागात त्या ‘ताई’म्हणून परिचित. मतदार आणि त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं तयार झालेलं. प्रकाश नाईकनवरे यांच्या प्रचारार्थ त्या प्रभागात दौरे करत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. मतदार येऊन भेटतात. महिला मतदार प्रचार फेरीत सहभाग होतात. लोकांचा हा प्रतिसाद नाईकनवरे यांना विजयाची खात्री देत आहे.