श्रीकांत जाधव यांना रंगबहार जीवनगौरव पुरस्कार, अठरा जानेवारीला मैफल रंगसुरांची
schedule11 Jan 26 person by visibility 25 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रंगबहार संस्थेच्यावतीने रविवार, (१८ जानेवारी २०२६) सकाळी ९ वाजता 'मैफल रंगसुरांची' हा कार्यक्रम टॉऊन हॉल येथे होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव यांना श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, तसेच कला प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. रंगबहारच्या मैफिलीचे हे ४९ वे वर्ष आहे.
कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर स्मृती सोहळ्यानिमित्त 'मैफल रंगसुरांची' १८ जानेवारी रोजी होत आहे. यामध्ये ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव यांना तेरावा श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे.
मैफलीत ओंकार पाटील हे शास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना मयुरेश मधुसूदन शिखरे (तबलावादक) यांची साथ लाभणार आहे, तर चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर (बेळगाव), अभिजित पोपट पाटील (सांगली), श्रुती रुग्गे (इचलकरंजी), प्रमोद देडगे (सावर्डे), अथर्व सावंत (कोल्हापूर), आदित्य सुतार (बेळगाव), श्रद्धा चराटकर (कोल्हापूर), किरण हणमशेट (बेळगाव), आशेर फिलीप (कोल्हापूर), दीक्षा देसाई (कोल्हापूर), सचिन बन्ने (मुंबई), तेजस पाटील (कोल्हापूर), स्वॉलिया इनामदार (इचलकरंजी) हे कला प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. शिल्पकार ओमकार मसूरकर (सावंतवाडी), प्रज्वल गोंधळी (सावर्डे), रोहन कुंभार (सांगली) हे शिल्प प्रात्यक्षिक सादर करतील. या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष धनंजय जाधव, सचिव संजीव संकपाळ यांनी केले आहे.