साने गुरुजींच्या कथेचे नायक सर्वधर्मीय –डॉ. माणिकराव साळुंखे
schedule24 Mar 25 person by visibility 63 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘साने गुरुंजीचार भर हा निरंतन विकासावर होता. तरुणांनी हा विचार अंगिकृत करुन समाज परिवर्तनाचे काम करावे. सानेगुरुजींच्या कथेचे नायक सर्वधर्मीय होते. त्यांचे लेखन चौफेर होते.’ असे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त् केले.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई संचलित कोल्हापूर जिल्हाा साने गुरुजी कथामाला कोल्हापूर आयोजित ५७ वे अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी साळुंखे बोलत होते.कथामालाचे अध्यक्ष शामराव कराळे हे अध्यक्षस्थानी होते. मुस्लिम बोर्डिंगच्या हॉलमध्ये अधिवेशन झाले. अधिवेशन परिसराचे नाव डॉ. एन. डी. पाटील तर सभागृहाचे नाव सहकारमहर्षी डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील असे ठेवले होते. प्रवेशद्वाराला नाव, साथी श्रीपतराव शिंदेव साथी मीरासाहेब मगदूम असे होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना साळुंखे म्हणाले,‘ सध्या समाजात जातीयतेची विषवल्ली पसरविण्याचे काम काही जातीयवादी संघटना करत आहेत. याप्रसंगी सानेगुरुजींच्या विचारांचे पाईक असणाऱ्या मंडळींनी अधिक सजग झाले पाहिजे.’ अधिवेशनाचे अध्यक्ष शामराव कराळे म्हणाले, ‘सानेगुरुजी कथामालेच्या माध्यमातून त्यांचे समाज, तरुण व विद्याथर्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.’
अधिवेशनाचे आयोजक हसन देसाई यांनी स्वागत केले. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, पांडूरंग नाडकर्णी, दादासाहेब पाटील, लालासाहेब पाटील, सुनील पुजारी, गजानन कोटेवार, अशोक म्हमाणे, रणजीत ठाकरे, आदी उपस्थित होते. सोनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केले. संध्या वाणी यांनी आभार मानले.
रविवारी सकाळी कोल्हापूर शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. राजर्षी शाहू समाधीस्थळ येथून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्ल्वी कोरगावकर, वसंतराव मुळीक, वसंतराव पाटील, अशोक चौगुले रघुनाथ मोरे, नेहा कानकेकर, भरत अलगौडर, गणी आजरेकर, अशोक पाटोळे, धोंडिराम ढेरे, हेमलता पाटील, कलाप्रसाद चव्हाण, सचिन सावंत, जगन्नाथ कांदळकर, शशिकांत पाटील, बाबा नदाफ, मोहन देशमुख (मिरज), शशिकांत पाटील (कुरुंदवाड) आदींचा सहभाग होता.