फुटबॉलपटूच्या उमेदवारीचे कौतुक, जवाहरनगर- सुभाषनगर परिसरात स्वागत
schedule05 Jan 26 person by visibility 87 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाने प्रभावित केलेल्या राष्ट्रीय फुटबॉलपटू ओंकार संभाजीराव जाधव यांच्या उमेदवारीचे जवाहरनगर, सुभाषनगर परिसरातून स्वागत झाले. ओंकार जाधव यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांनी काढलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. उमेदवारांनी मतदारांना अभिवादन करत निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीकडून शिवसेनेचे ओंकार संभाजीराव जाधव, भाजपकडून रेखा उगवे माधुरी वहटकर आणि राष्ट्रवादीकडून नियाज खान यांची उमेदवारी आहे. महायुतीच्या उमेदवारांनी सोमवारी 5 जानेवारी रोजी जवाहरनगर, सुभाषनगर परिसरातून प्रचार फेरी काढली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जवाहर नगर चौक येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली. जवाहरनगर मधील अंतर्गत कॉलनी, अपार्टमेंट मधील रहिवाशी यांची भेट घेऊन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. बिजली चौक, साई मंदिराच्या मागील परिसर, संत रोहिदास विद्या मंदिर परिसर, सुभाषनगर अशा विविध भागातून ही प्रचार फेरी निघाली राष्ट्रीय फुटबॉलपटू ओंकार जाधव यांनी नगरसेवक म्हणून प्रभागात विकासकामे करू वेगवेगळ्या योजना राबवू असे सांगितले. महायुतीकडून तरुण व राष्ट्रीय फुटबॉल पटोला उमेदवारी दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले या प्रचार फेरीमध्ये माजी नगरसेवक सुनील पाटील, शशिकांत वहटकर, शशिकांत तिवले, शाहरुख तपासे, आशिष महागावकर, शिवाजी परशुराम माने राहुल मगर, आनंदा सोनवणे आदींचा सहभाग होता. प्रचार फेरीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.