कणेरी मठावर अवतरली देशभरातील कलाकुसरी, हस्तकलेचा आविष्कार
schedule31 Mar 26 person by visibility 37 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विविध राज्यातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अनेक कलाकुसरीच्या वस्तू, हस्तकला कणेरी मठ येथे एकवटल्या आहेत. कलाकारांचे कसब आणि कौशल्य यातून कलात्मकता हे वैशिष्ट्य ठरले आहे. निमित्त आहे, 'सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’चे
श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालयतर्फे ३१ मार्च ते चार एप्रिल २०२६ या कालावधीत 'सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सिद्धगिरी येथे झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.प्रिया शिंदे, डॉ. वर्षा पाटील उपस्थित होते.
. कारागीर महाकुंभध्ये १७ राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० हून कलाकार 'सिध्दगिरी कारागीर महाकुंभा’मध्ये सामील होत आहेत. टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबू काम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला बाहुलींच्या प्रतीकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छ मधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्न पासून वस्तू. मधुवेनी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळतील.
या सिद्धगिरी कारागिर महाकुंभ उद्घाटन सोहळ्यात प्रास्ताविक यशोवर्धन बारामतीकर यांनी तर सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालानयचे उपसंचालक भरत लांगे, शशिकांत पुजारी, शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील, राहुल चिकोडे, गुंडोपंत वद्द, विक्रम पाटील, एकत्वं इन्फ्राचे प्रबुद्ध परदेशी यांच्यासह नागरिक, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हा महाकुंभ चार एप्रिल पर्यंत चालणार असून नागरिकांनी या कारागिर महाकुंभास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले.
.