गायमुख येथे जनावरांसाठी सेवा, बैलांना चारा - पेंडची सुविधा
schedule31 Mar 26 person by visibility 18 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘चांगभलं’च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेत भक्तीबरोबरच माणुसकीचा एक हृदयस्पर्शी पैलू पाहायला मिळतो. आपल्या लाडक्या सर्जा-राजाला घेऊन शेकडो मैलांचा प्रवास करत देवदर्शनासाठी येणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या मुक्या जनावरांचाही प्रवास तितकाच कठीण असतो. मात्र सहजसेवा ट्रस्टने या या जनावरांना चारा आणि पाण्याची सोय करत माणुसकीचे दर्शन घडविले. ट्रस्टतर्फे यंदाही बैलांना कपरी पेंड, भुस्सा आणि दर्जेदार चारा वाटप करण्यात आला. “पशूसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. बैलांच्या मुखाशी चारा जाताना पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हे कोणत्याही सन्मानापेक्षा मोठे असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. या उपक्रमामुळे यात्रेसाठी आलेल्या शेकडो बैलांना पोटभर अन्न मिळाले. सहजसेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे जोतिबा यात्रा कालावधीत भाविकांसाठी अन्नछत्र चालविले जाते