वीरशैव लिंगायत दीपस्तंभ पुरस्कारांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा मरणोत्तर सन्मान
schedule02 Jun 25 person by visibility 110 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा वीरशैव लिंगायत दीपस्तंभ स्मृती पुरस्कार देऊन मरणोत्तर सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष व रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या रजनी मगदूम व नात डॉ. पूजा पाटील यांनी स्वीकारला.
लिंगायत संघर्ष समिती, महाराष्ट्र व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन आयोजित वीरशैव लिंगायत दिपस्तंभ स्मृती गौरव पुरस्कार व स्मरणिका प्रकाशन सोहळा अतिशय उत्साहात व दिमाखात पार पडला. डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य काशी महास्वामी आणि गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वीरशैव लिंगायत दीपस्तंभ स्मृती गौरव पुरस्काराचे वितरण झाले.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी देशाप्रती व समाजाप्रती केलेले सामाजिक राजकीय सांस्कृतिक, क्रीडा, स्वातंत्र्य संग्राम, आर्थिक व सहकार क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्य हे अनमोल आहे. या बहुमोल योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरम्यान या समारंभात निळकंठराव अण्णासाहेब कल्याणी पुणे, वामदेवराव विश्वनाथ रुकारी पुणे, विश्ववाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे, वारणानगर, शिवैक्य आम. अप्पासाहेब ऊर्फ सा.रे. पाटील, कोल्हापूर, बाबुराव चलाप्पा चाकोते, सोलापूर, शिवैक्य कर्मयोगी म.बं. तथा आप्पासाहेब काडादी, सोलापूर, शिवैक्य हरीभाऊ जागोबाजी नाईक कागपूर, सिद्धीविनायक काशिनाथप्पा बोंद्रे चिखली, वागवाथप्पा तात्याप्पा हालगे परकी, माधवराव बापूराव पाटील मुरुम, केशरकाकु सोनाजीराव क्षीरसागर बीड, बाबुराव बळवंत पाटील बुदिहाळकर कोल्हापूर, भाऊसाहेब पांडुरंग गुदगे सातारा यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी निमंत्रित लिंगायत भूषण खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी मंत्री दिलीप सोपल, विजयकुमार देशमुख, सिद्धराम म्हेत्रे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.