चित्रपट महामंडळातर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर जयंती साजरी
schedule03 Jun 25 person by visibility 66 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची १३५ वी जयंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे साजरी करण्यता आली. शिवाजी पेठेतील पद्माराजे गार्डन येथील बाबुराव पेंटर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सिने कॅमेरामन इम्तियाज बारगीर यांच्या हस्ते पूजन झाले. मंगळवारी, ३ जून रोजी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपस्थितांनी, कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या कलाकृतीचे मोठेपण नमूद केले. कार्यक्रमाला चित्रपट यावेळी चित्रपट महामंडळाचे संचालक रणजीत जाधव, सतीश बिडकर, विजय शिंदे, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती, सुभाष गुंदेशा, अर्जुन नलवडे, वनिता दीक्षित, अनिल काशीकर, संजय पटवर्धन, सुनील मुसळे, विजय पोळ, हनमंत जोशी, अमर मठपती, बाबा लाड, दिलीप काटे, रवींद्र बोरगावकर, नम्रता गोडबोले, सिद्धेश मंगेशकर उपस्थित होते.