Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरेभालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!केआयटीतर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधी रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमवडगावमध्ये उभारणार १०० खाटांचे हॉस्पिटल ! खासदार-आमदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक !! शिक्षक त्रस्त, दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन ! प्रशिक्षण नावापुरतेच, प्रशिक्षणाची वेळही गैरसोयीची !!देशभरातील टॉप टेन संशोधकात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद पाटील !चित्रपट महामंडळातर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर जयंती साजरीसुवर्णा सावंत यांनी स्वीकारला माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार

जाहिरात

 

वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनची समस्या

schedule02 Jun 25 person by visibility 875 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापुर :  कला व क्रीडा शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास सोमवारपासून सुरुवात झाली. दरम्यान प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाला. प्रशिक्षणा दरम्यान पावणे बारा वाजता पंधरा मिनिटाची पूर्व चाचणी परीक्षा होणार होती. पण सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ही परीक्षा वेळेत होऊ शकली नाही. कला व क्रीडा शिक्षकांचे तीन दिवसांचे विभाग स्तरावर होणारे निवासी प्रशिक्षणाचा खर्च ही प्रशिक्षणार्थ्यांना स्वतः करावा लागणार आहे. पण या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणा दरम्यान चहा आणि भोजन याची कोणतीही व्यवस्था नाही तसेच मानधन अथवा प्रवास भत्ता नाही याकडे शिक्षक लक्ष वेधत आहेत.      दोन वर्षापेक्षा अधिक कालखंडानंतर हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने होत आहे. कोरोनाच्या साथी दरम्यान हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेताना यासाठी दोन हजार रुपये इतके शुल्क आकारण्यात आले होते. आता हे प्रशिक्षण ऑफलाईन होत असतानाही प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून दोन हजार रुपये शुल्क भरून घेण्यात आले आहे दरम्यान   प्रशिक्षण हे स:शुल्क व शिक्षकांच्या मागणीवरून घेण्यात आल्याने कोणत्याही प्रकारचे मानधन अथवा चहा भोजनाची व्यवस्था करण्यात आली नाही असा खुलासा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes