लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
schedule01 Jun 25 person by visibility 99 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्यावतीने नऊ जून २०२५ रोजी समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. कोल्हापुरातील दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
लिंगायत समाजाच्या वतीने दरवर्षी समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. यंदाही या गुणी विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या व सायकल वाटप होणार आहे. समाजाच्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विविध व्यक्तींचाही यावेळी कृतज्ञता गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच विविध पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे.
या समारंभाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत बैठकीस समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, महिला संघटनेच्या अध्यक्षा वंदना माळी, उपाध्यक्ष वैशाली माळी, कार्याध्यक्ष विद्या माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.