Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 रंगबहारतर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन महापालिकेच्या सिटी इंजिनीअरपदी हर्षजीत घाटगे, जल अभियंतापदी रमेश मस्करवाढीव टप्पासाठी पाच जूनपासून कोल्हापूर-गारगोटी पायी दिंडीवरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनची समस्याकिसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकरनेर्लीत सतेज - ऋतु बैलगाडी शर्यतीचा थरार, सरपंच राजा-आरएक्स बैज्या बैलजोडीने जिंकले मैदान वीरशैव लिंगायत दीपस्तंभ पुरस्कारांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा मरणोत्तर सन्मानराजारामपुरीतून रॅली, कार्यकर्त्यांच्या घोषणा अन् जल्लोषी स्वागत ! विजय जाधव यांचा कार्यालय प्रवेश !!चंदेरी आठवणींना उजाळा देत प्रभात फिल्म कंपनीचा वर्धापनदिन साजराबाजार समितीच्या ५५ माजी संचालकांना नोटीस, जिल्हा सहकार उपनिबंधकांची कार्यवाही

जाहिरात

 

गोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोले

schedule01 Jun 25 person by visibility 177 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने मागील चार वर्षांमध्ये पारदर्शक व उत्पादकाभिमुख धोरणांमुळे आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात ठोस प्रगती साधली आहे. हे यश विश्वासार्ह व परिणामकारक कार्यपद्धतीचे प्रतिक आहे असे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी, शनिवारी (३१ मे २०२५) पत्रकार परिषदेत गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांना उद्देशून गोकुळसंबंधी चार प्रश्नांची उत्तरे विचारली होती. दरम्यान गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोल यांनी रविवारी पत्रकाद्वारे गोकुळची गेल्या चार वर्षातील कामकाजाचा आलेख मांडला अहे.

गोडबोले यांनी म्हटले आहे, ‘३१ मार्च २०२१ अखेर गोकुळ संघाकडे एकूण गुंतवणूक ठेवी  ३२२ कोटी इतक्या होत्या. मागील चार वर्षांत संघाने विविध धोरणात्मक निर्णय, पारदर्शक कारभार व उत्पादकाभिमुख कार्यपद्धती यामुळे  १९० कोटींची वाढ साधली. ३१ मार्च २०२५ अखेर ही रक्कम  ५१२ कोटींवर पोहोचली आहे. वासाच्या गायीच्या दुधाला प्रति लिटर २ रुपये व वासाच्या म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ३ रुपये दरवाढ देऊन, योग्य मोबदला दिला गेला. येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर आणखी चर्चा करून दरवाढ करण्याचाही विचार केला जाणार आहे.

गेल्या चार वर्षांत गोकुळ संघाने उत्पादकांना उच्चांकी दूध दर तसेच अंतिम दूध दरफरक दिले असून गतसाली प्रतिदिनी १८.५० लाख लिटर  दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला. संघाच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमामुळे उच्चांकी म्हैस दूध संकलन या साली झाले. विशेषतः म्हैस दूधाच्या दरामध्ये सरासरी १२ रुपये प्रति लिटर वाढ तर गाय दूधाच्या दरामध्ये सरासरी ९ रुपये प्रति लिटर वाढ दिली आहे, गाय दुधाचे उत्पादन वाढल्यामुळे तसेच गाय दूध पावडर व लोण्याचे दर कमी झाल्यामुळे गाय दूध खरेदी कमी झाले होते त्यावेळी गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना रुपये ३३ अधिक शासनाचे अनुदान रुपये ७ असे एकूण ४० रुपये इतका उच्चांकी दर काही कालावधीत मिळाला आहे.  दरवाढ म्हणजे गोकुळ संघाने उत्पादकांना बाजाराच्या स्पर्धात्मक दरातही न्याय दिला आहे. यामुळे सद्या एप्रिल- मे या कालावधीत संघाचे सरासरी दूध संकलन १५ लाख ५० हजार इतके राहिले आहे ते गतसालच्या संकलनाच्या तुलनेत जास्त आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes