Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक त्रस्त, दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन ! प्रशिक्षण नावापुरतेच, प्रशिक्षणाची वेळही गैरसोयीची !!देशभरातील टॉप टेन संशोधकात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद पाटील !णण तत थथ थथ सुवर्णा सावंत यांनी स्वीकारला माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार रंगबहारतर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन महापालिकेच्या सिटी इंजिनीअरपदी हर्षजीत घाटगे, जल अभियंतापदी रमेश मस्करवाढीव टप्पासाठी पाच जूनपासून कोल्हापूर-गारगोटी पायी दिंडीवरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनची समस्याकिसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकरनेर्लीत सतेज - ऋतु बैलगाडी शर्यतीचा थरार, सरपंच राजा-आरएक्स बैज्या बैलजोडीने जिंकले मैदान

जाहिरात

 

चंदेरी आठवणींना उजाळा देत प्रभात फिल्म कंपनीचा वर्धापनदिन साजरा

schedule02 Jun 25 person by visibility 128 categoryसामाजिक

 

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे प्रभात फिल्म कंपनीचा ९६ वा वर्धापन दिनानिमित्त एक जून रोजी साजरा झाला. मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी येथील  प्रभात तुतारी शिल्पाचे पूजन करण्यात आले. चित्रपट महामंडळाचे संचालक रणजीत जाधव, संचालक सतीश बिडकर, बाळकृष्ण बारामती,  मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर,अरुण शिंदे, विजय ढेरे,सुनील मुसळे,बबन बिरजे, प्रकाश गवळी,अनिल काशीकर, दिलीप काटे अमर मठपती, सुभाष कांबळे, मंगेश मंगेशकर, मानसिंग साळोखे, सुभाष गुंदेशा, विजय शिंदे, वनिता दीक्षित, रवींद्र बोरगावकर, सिद्धेश मंगेशकर उपस्थित होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहास घडविणारे महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती संस्था स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरात झाली. विष्णूपंत दामले, शेख, फत्तेलाल, व्ही.शांताराम, केशवराव धायबर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. या कंपनीने गोपालकृष्ण, खुनीखंजीर उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा अनेक मुखपटाची निर्मिती केली. १९३२ मध्ये अयोध्याचा राजा या बोलपटाची निर्मिती केली. शिवाय अनेक मराठी हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. प्रभात फिल्म कंपनीच्या चंदेरी आठवणींना उजाळा देत हा दिन साजरा करण्यात आला.

………………….

कलामहर्षि बाबूराव पेंटर यांची १३५ वी जयंती  ३ जून २०२५ रोजी आहे. यादिवशी सकाळी ९-३० वाजता पद्मा गार्डन, संध्यामठ समोर शिवाजी पेठ येथे जयंती साजरी करण्यात येणार आहे.तरी सर्व हितचिंतक, रसिक, चित्रकर्मी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes