काँग्रेसकडून गगनबावडा तालुक्यातील जिप - पंचायत समित्यासाठी उमेदवार जाहीर
schedule20 Jan 26 person by visibility 122 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून अॅड. सोनाली विलास पाटील तर असळज मतदारसंघातून संभाजी शांताराम पाटणकर यांची नावे घोषित केली आहेत. पंचायत समिती अंतर्गत तिसंगी मतदार संघातून अमर केशव कांबळे, असंडोली येथून छाया प्रकाश देसाई, असळज मतदारसंघातून राजेश भगवान पाटील, तर धुंदवडे मतदारसंघातून शुभांगी कुंडलिक संकपाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. खासदार शाहू महाराज, जिल्हाध्यक्ष व आमदार पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या सूचनेनुसार या उमेदवारांची निश्चिती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मान्यता दिली आहे.